Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाघाची कातडी व वाघनखांसह टोळी जेरबंद, न्यायालयाने सुनावली चौघांना चार मे पर्यंत वनकोठडी

team by team
May 1, 2023
in क्राईम
0
वाघाची कातडी व वाघनखांसह टोळी जेरबंद, न्यायालयाने सुनावली चौघांना चार मे पर्यंत वनकोठडी

नंदूरबार l प्रतिनिधी

 

वाघाची कातडी व वाघनखे विक्रीसाठी आणलेल्या तीन व खरेदीदार एक अशा चार जणांना शहादा बसस्थानकावर जेरबंद करण्यात आले आहे.याप्रकरणी चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 मे पर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

 

सविस्तर वृत्त असे की, वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दि २९ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता शहादा बसस्थानकावर गूजराथ राज्यातून वाघाची कातडी व वाघनखे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली.

 

वनविभागाच्या टिमने सापळा लावला.तेथे तीन जण वन्यप्राण्यांचे अवयव विक्रीसाठी व एक जण खरेदीदार संशयास्पद आढळून आले.त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.त्या व्यक्तींकडून वन्यप्राणी वाघाची कातडी एक व वीस वाघनखे हस्तगत करण्यात आली.याप्रकरणी रामचंद्र गोविंद जाधव रा मोराणे,राया बयसिंग हूंबरे रा. चिपी दोन्ही ता सटाणा जि नाशिक,सूखीराम महारु भदाणे रा. बंधारपाडा,ता साक्री जि धूळे,चंदन शमनलाल टेकवाणी या चार जणांना अटक करण्यात आली.

 

 

या शहादा या चौघांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या कलमांतर्गत वन गून्हा नोंदवण्यात आला आहे.सदर आरोपींना शहादा न्यायालयात हजर केले असता ४ मे २०२३ पर्यंत वनकोठडी देण्यात आली आहे.

 

 

सदरची कारवाई वन उपसंरक्षक कृष्णा भंवर नंदूरबार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक संजय साळूंके अक्राणी, वनक्षेत्रपाल आशूतोष मेढे शहादा,वनपाल एस.एन.पाटील दरा, वनपाल बी.पी.जमदाडे जयनगर, वनरक्षक एक. जी. मूकाडे,आर.जी.वसावे,एफ.एन.वसावे,विक्रम पाटील आदींचा कारवाईत सहभाग होता.पूढील तपास आशूतोष मेढे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

मोठ्ठी बातमी : पातोंडा येथे युवकाचा आढळला मृतदेह ?, शेतात आढळला महिलेचा मृतदेह

Next Post

भरत गावित यांचा समतारत्न पुरस्काराने गौरव

Next Post
भरत गावित यांचा समतारत्न पुरस्काराने गौरव

भरत गावित यांचा समतारत्न पुरस्काराने गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add