नंदुरबार l प्रतिनिधी
गुजरात राज्यातील सारंगपूर येथील नवसाला पावणाऱ्या श्री कष्टभंजन हनुमानजी मूर्तींची प्रतिकृती नंदनगरीत साकारण्यात आली आहे. नवनिर्माणधिन मंदिर आणि पुरातन मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागातील श्रीजी हॉस्पिटल, अमर सिनेमागृहा जवळील दत्त चौकात श्री कष्टभंजन हनुमान मंदिराची भव्य निर्मिती करण्यात आली आहे.

सोमवार दि.1 मे रोजी सकाळी 8 वाजता हनुमान मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात येईल.त्यानंतर प्रायचीत्त विधान, गणेश पूजन, पंचकर्म, श्री मूर्तीला संस्कार, जलधिवास, दुपारी 2 ते 6 या वेळेत होईल.तसेच सायंकाळी 7 वाजता पूजा व आरती करण्यात येईल.गुरुवार दि. 2 मे रोजी मूर्ती जलधिवास, धान्यधिवास, नवग्रही देवता स्थापना, सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत होईल. होमहवन दुपारी 2 ते 6 वाजेपर्यंत तसेच मूर्ती तृतीय संस्कार सायंकाळी 7 वाजता होईल.
बुधवार दि. 3 मे रोजी श्री कष्टभंजन हनुमानजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा, स्थापना, प्रधान हवन, बलिदान, ध्वजारोहण, कलश पूजन, पूर्णाहुती, सकाळी 8 ते 12 आणि त्यानंतर दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसाद (भंडारा) वाटप होईल.भाविकांनी महाप्रसाद आणि दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक जय दत्त व्यायाम शाळा आणि श्री कष्टभंजन हनुमान मंदिर समितीतर्फे करण्यात आले.