नवापूर l प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ पैकी अकरा जागांवर काँग्रेस पक्ष पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार निवडून आले तर भाजप पुरस्कृत शेतकरी परिवर्तन विकास पॅनलचे सहा उमेदवार निवडून आले.
नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ संचालक पदासाठी ३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. २८ एप्रिल ला मतदान झाले. आज नवापूर येथे मतमोजणीला निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक शीतल महाले यांच्या नियंत्रणाखाली सकाळी आठ पासून सुरवात झाली. दुपारी पावणे पाच पर्यंत मतमोजणी पूर्ण झाली.
पहिल्या टप्प्यात व्यापारी गटातील उमेदवारांची मतमोजणी झाली त्यात भाजपच्या परिवर्तन पॅनलचे लखन गिरधारीलाल अग्रवाल ( ४१) व गिरीश पद्माकर गावित(७३) या दोघांचा विजय झाला.
कृषी सहकारी पतसंस्था सर्वसाधारण गटातून
गंगाजी गंगाराम कोकणी (१२१) , दिनकर हुरजी गावित(१२५), धीरसिंग लालजी गावित(१२३), विनायक ठगण्या गावित (१२७), बकाराम फत्तेसिंग गावित(१३५), नवलसिंग सिंगा गावित (१२०), प्रेमलाल बापू वसावे (१३०)
कृषी सहकारी पतसंस्था, महिला राखीव गटातून
कलीबाई जयसिंग गवळी (१४५), जयश्री मधुकर नाईक (१४२). कृषी सहकारी पतसंस्था, अनुसूचित जमाती गटातून अशोक पोसल्या गावीत (१३९)
कृषी सहकारी पतसंस्था, इतर मागास प्रवर्ग तुन
आरिफ इब्राहिम बलेसरिया (१४८). हे अकरा काँग्रेस पक्षाचे शेतकरी विकास पॅनल चे उमेदवार विजयी झाले.
ग्रामपंचायत, सर्वसाधारण गटातून
अमिता राहुल वसावे (५६९), सुनील दिवल्या वसावे (५२३).
ग्रामपंचायत, अनुसूचित जाती, जमाती गटातून
भालचंद्र केवजी गावित (५४१)
ग्रामपंचायत, आर्थिक दुर्बल घटक गटातून
रमिला दिलीप गावित (५४८) हे चार भाजपा पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनलचे विजयी झाले.