Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वीज यंत्रणेजवळ कचरा टाकू वा जाळू नका महावितरणचे नागरिकांना आवाहन

team by team
April 28, 2023
in क्राईम
0
वीज यंत्रणेजवळ कचरा टाकू वा जाळू नका  महावितरणचे नागरिकांना आवाहन
नंदुरबार l
 सध्या कडक उन्हाचे दिवस आहेत. अनेक ठिकाणी वीज वाहिन्या, रोहित्र, फीडर पिलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारांमुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच वीजवितरण कंपनीलाही नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या तप्त वातावरणात वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये आणि जाळूही नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
 
     शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पिलर, वितरण रोहित्र, वितरण पेटी किंवा विद्युत खांब अशा वीज यंत्रणेजवळील उघड्यावर असलेल्या जागेत कचरा टाकण्यात येतो. वीज यंत्रणेजवळ साठवलेला हा कचरा पेटवल्याने किंवा इतर कारणामुळे कचरा जळाल्याने विजेच्या भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पर्यायाने संबंधित परिसरातील वीजपुरवठाही खंडित झालेला आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने कचऱ्यास आगी लागण्याचे प्रकार वाढत आहेत.
 
     उन्हामुळे तापलेल्या वीज यंत्रणेला असल्याने अशा आगीमुळे फटका बसतो. वीजवाहिनीखाली असलेल्या कचऱ्याचे ढीग पेटल्यामुळे किंवा त्याला आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका अधिक आहे. शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी उघड्यावर असलेल्या वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये. अशा घटनांतून वीज यंत्रणेला आग लागल्याचे आढळल्यास 1912 किंवा 1800-212-3435 आणि 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकावर किंवा नजिकच्या महावितरण कार्यालयाला त्याची माहिती देण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 
बातमी शेअर करा
Previous Post

इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

नंदूरबार करांकडे १७ कोटी ५० लाखांचा मालमत्ता कर थकबाकी

Next Post
नंदूरबार करांकडे १७ कोटी ५० लाखांचा मालमत्ता कर थकबाकी

नंदूरबार करांकडे १७ कोटी ५० लाखांचा मालमत्ता कर थकबाकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026
सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

February 20, 2026
शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

February 20, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

February 20, 2026
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

February 20, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add