Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षाद्वारे सुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पाच नागरिक मायभूमीत सुखरूप दाखल

team by team
April 28, 2023
in राष्ट्रीय
0
महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षाद्वारे सुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पाच नागरिक मायभूमीत सुखरूप दाखल

नवी दिल्ली l

 

सुदानमध्ये आंतरिक संघर्षामुळे अशांततेचे वातावरण असून तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरु केले आहे. या मोहिमेअंतर्गत बुधवारी रात्री एका विशेष विमानाने एकूण 360 भारतीय नागरिक दिल्लीत सुखरूप दाखल झाले असून यात महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश आहे. या पाचपैकी तीन नागरिकांना महाराष्ट्र सदन सहकार्य कक्षाच्या माध्यमातून स्वगृही पाठविण्यात आले आहे.

 

थोडक्यात तपशील

ऑपरेशन कावेरी अंतर्गत विशेष विमान एसवी-3620 जेडाह (सौदी अरब) येथून बुधवारी रात्री इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिल्ली येथे दाखल झाले. यामध्ये महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश होता.

महाराष्ट्र सदन सहकार्य कक्ष सुरु

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

 

सुदान मधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे, यासाठी महाराष्ट्र सदनाचे प्रभारी निवासी आयुक्त नीवा जैन यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. सदनाचे अपर निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र शासनासोबत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत.

 

सुदान येथून दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी कक्षाद्वारे समन्वय केला जात आहे. विमानतळाहून नागरिकांना महाराष्ट्र सदनापर्यंतची वाहतूक व्यवस्था तसेच निवास, भोजन व्यवस्था या कक्षामार्फत करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अखेर : नंदूरबार शहरातील अतिक्रमणावर चालला हातोडा

Next Post

इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post
पीएमश्री योजेने अंतर्गत विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यातील ८ शाळांचा आदर्श शाळा म्हणून विकास होणार

इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add