नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या बोगस बियाणे विक्रीला प्रतिबंध घालण्यात यावी अशी मागणीचे निवेदन उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.
अप्पर जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात शेतकऱ्यांना बोगस बियाणे कापुस, मका, सोयाबीन आदी प्रकारचे बियाणे निकृष्ट दर्जाचे देऊन शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्नात मोठा नुकसानाचा बोजा वाढत आहे व बोगस खते औषधे विक्री होताना दिसत असताना सुद्धा कृषी विभाग कडून लक्ष दिलं जात नसल्याने शेतकरी नाराज व चिंतेत पडले असल्याचे दिसत आहे. तसेच कृषी विभागाकडून शासनाकडून विविध योजना मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई सुद्धा आजपर्यंत मिळत नाही आहे.याबाबत लवकर कारवाई व्हावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. निवेदनावर तात्काळ दखल घ्यावी अन्यथा शेतकरी वर्ग कृषी विभाग च्या कार्यालयावर शिंगाडे मोर्चा काढून टाळे ठोक आंदोलन करु याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी निवेदन देताना शिवसेना महानगर प्रमुख पंडित माळी, उपजिल्हाप्रमुख के. डी.गावित, तालुका प्रमुख विजू ठाकरे, जिल्हा सचिव दिनेश भोये, छोटू चौधरी, रूपा भरवाड, इम्तियाज कुरेशी, भीमा भरवाड आदी उपस्थित होते.