Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नीट,जेईई पात्रता परीक्षेसाठी आदिवासींना मोफत प्रशिक्षण द्या, ट्रायबल फोरमची मागणी

team by team
April 26, 2023
in राजकीय
0
नीट,जेईई पात्रता परीक्षेसाठी आदिवासींना मोफत प्रशिक्षण द्या, ट्रायबल फोरमची मागणी
अक्कलकुवा l प्रतिनिधी
 डॉक्टर ,इंजिनिअर या पदांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना नीट,जेईई या पात्रता परीक्षा द्याव्या लागतात. या पात्रता परीक्षा पास होण्यासाठी क्लाँसेस लावावे लागतात.या क्लासेसचा खर्च वर्षाला दोन ते चार लाख रुपये येतो.आदिवासी विद्यार्थी लाखोंचा एवढा खर्च कोठून करणार ? असा प्रश्न उपस्थित करत महाज्योतीच्या धर्तीवर टिआरटिआयनेही आदिवासी विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनिअर या पदांच्या अभ्यासक्रमासाठी द्यावी लागणारी नीट,जेईई पात्रता परीक्षेच्या  तयारी करीता पुर्व परीक्षा मोफत आँनलाईन प्रशिक्षण देण्याची मागणी ट्रायबल फोरम नंदुरबार या संघटनेने केली आहे. या संदर्भात आदिवासी मंत्री डॉ. विजयकुमार गावित,आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांना तहसीलदार यांच्या मार्फत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.
 विद्यार्थ्यांची डॉक्टर व इंजिनिअर बनण्याची इच्छा असली तरी पालकांची आर्थिक परिस्थिती व क्लाँसेसची फी यामुळे इयत्ता दहावी नंतर अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश प्रवेश घेऊ इच्छित असलेले सामान्य व साधारण कुटुंबातील आदिवासी विद्यार्थी नीट,जेईईचे महागडे प्रशिक्षण क्लास लावू शकत नाही. आदिवासी समाजातील सर्व सामान्य कुटुंबातील मुले -मुली डाँक्टर, इंजिनिअर झाले पाहिजे.यासाठी त्यांना नीट,जेईई परीक्षा पूर्व मोफत आँनलाईन प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिलेली आहे. आणि त्यातील जे विद्यार्थी इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन नीट,जेईईची तयारी करुन डॉक्टर ,इंजिनिअर होण्याची स्वप्ने बाळगून आहे.अशा आदिवासी विद्यार्थ्यांना नीट व जेईईचे परीक्षा पुर्व मोफत आँनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी योजना तयार करुन प्रशिक्षण देण्यात यावे.अशी मागणी ट्रायबल फोरमने केली आहे.
यावेळी जिल्हा अध्यक्ष नितीन तडवी,जिल्हा सचिव रविंद्र वळवी , जिल्हा कोषाध्यक्ष वसंत वसावे,  तालुका अध्यक्ष अक्कलकुवा सिमादादा तडवी ,रवी पावरा, सुनील वसावे, तेजस पाडवी आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारच्या प्रकल्प अधिकारी राज शिष्टाचाराचे पालन करीत नसल्याची आ. आमश्या पाडवी यांची तक्रार

Next Post

काकर्दे येथे खंडेराव महाराज यात्रा उत्साहात साजरी

Next Post
काकर्दे येथे खंडेराव महाराज यात्रा उत्साहात साजरी

काकर्दे येथे खंडेराव महाराज यात्रा उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add