म्हसावद l प्रतिनिधी
डहाणू तालुक्यातील डमाडपाडा येथे आदिवासी कुंटुबाल मारहाण केल्याचा निषेध करीत B T S संघटनेकडुन तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
शहादा येथील भारतीय ट्रायबल टाईगर सेनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डहाणू तालुक्यातील धानिवरी ईमाडपाडा येथे आदिवासी आठ कुंटूब तिथ राहात असताना त्या जागेवर मुंबई – बडोदा एक्सप्रेसच्या भूसंपादन करीत असताना त्या जागेवर आदिवासी ना मोबदला मिळावा तसेच पुनवर्सनन करावे तरी मुंबई बडोदा एक्सप्रेस काम चालु असताना त्या आदिवासीनी नकार दिल्याने पोलीसांनी घरात घुसुन मारहाण करून लहाण मुलांना घराबाहेर काढून संसार उदवस्त केल्यामुळे सर्व आदिवासी या घटने बाबत निषेध करण्यात आला.
भारतीय ट्रायबल सेना शहादा येथे या घटने बाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी भारतीय ट्रायबल सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सतिश ठाकरे, तालुका अध्यक्ष योगेश पवार, तालुका युवा अध्यक्ष राहुल उरवळदे, प्रेम उरवळदे, विलास अहिरे, करमासिंग पाडवी, वसंत चौधरी, करण चौधरी आदी उपस्थित होते.








