नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील कुढावद गावात भव्य द्वारकाधीश महाराजांच्या मंदिराचे व मूर्तीची स्थापना राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आली.
कुढावद या गावासाठी डॉ. गावित यांच्या निधीतून समाज मंदिर देण्यात आले, तर लोकवर्गणीतून श्री द्वारकाधीश मंदिराच्या आणि मूर्तीची स्थापना करण्यात आली.
या कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, सांसद रत्न खासदार हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित मंदिरातील महंत गावातील सरपंच उपसरपंच आणि पंचक्रोशीतील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.








