नंदुरबार । प्रतिनिधी
मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह 25 जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.22 एप्रिल 2023 रोजी रात्री 8 च्या सुमारास परवेज उर्फ मक्कु शेठ करामत खान (वय 45, नगरसेवक, रा.मन्यार मोहल्ला), परवेज उर्फ मक्कु शेठ करामत खान याचा लहान भाऊ, आरीफ शेख कमर (रा.गाझीनगर), आरीफ शेख कमर (रा. गाझी नगर), हारुन हलवाई (रा.हलवाई गल्ली नंदुरबार), हारुन हलवाई याचा भाऊ, फारुख अब्दुल गणी मेमन (रा.मुजावर मोहल्ला), खाटीक शेख शोएब शेख आसिफ (रा.पटेलवाडी), जावेदखान उर्फ जाकीर सुपारी दुकानवाला (रा.गाजीनगर), मतीन डॉक्टर (रा.रज्जाक पार्क), नसीर जान मोहम्मद भिस्ती (रा. घोडापीर मोहल्ला), साबीर शेख अमिर (सऊद नगर पालीका कर्मचारी सुपरवायझर), फरीद मिस्तरी (रा.चिरागगल्ली), मोहम्मद मेमन,
फिरोज हलवाई हारुन हलवाई (रा. हलवाई गल्ली) याचा काकाचा मुलगा, सलाम (रा. घोडापीर मोहल्ला), पप्पु कुरेशी (रा.बिस्मील्ला चौक), बिलाल (रा.चिराग मशिद जवळ), जावेदखान जाकीर सुपारी दुकानवाला याचा भाऊ सत्तार (रा- दौशहा तकिया), ईलीयास खान मोहम्मद खान (रा.गाझीनगर), इरफान (रा.करीम मंजील समोर), बबलू सैय्यद (रा.गाझीनगर), सलमान सत्तार पिंजारी रियाज (रा. चिराग नंदुरबार) हे नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात तक्रार द्यायची आहे, असे सांगुन आले.
तसेच पोलीस ठाण्याच्या बाहेर रस्त्यावर बसून आमचा गुन्हा नोंदवा असे जोरजोरात बोलुन और लोगो को बुलाव और लोगों को बुलाव असे बोलून पोलीस ठाणेस गुन्हा दाखल केल्यावरच आम्ही येथुन जावु असे सांगितले. जिल्हाधिकार्यांनी दि.19 ते 25 एप्रिलदरम्यान मनाई आदेश जारी केलेला असतांना त्यांनी आदेशाचे उल्लंघन केले.म्हणून पोना इसमल कुसमल पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरील 25 जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.शिंदे करीत आहेत.








