Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे महिला पोलिसात मारहाण प्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल

team by team
April 24, 2023
in क्राईम
0
शेल्टापाणी येथे दोन गटात वाद,  तिघे जखमी ; परस्पर फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्हा
नंदुरबार l प्रतिनिधी
 शहरातील अंधारे चौकातील रस्ता दुभाजकाजवळ अक्षय तृतीयेला वाहूतूकीचे नियंत्रीत करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करीत मारहाण केल्याप्रकरणी त्या दोघा भावांविरुध्द नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२२ रोजी  अक्षय तृतीयेला दुपारी १ वाजेच्या सुमारास एक महिला पोलिस कर्मचारी नंदुरबार शहरातील अंधारे चौक परिसरात वाहतूक नियंत्रणाचे काम करीत होत्या. यावेळी सरोज परवेज खान याने त्याच्या सहकाऱ्यांसह शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याजवळ जाऊन अश्लिल शिवीगाळ केली. तसेच सदर महिला पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर ओढून हाताबुक्यांनी मारहाण केली.
या मारहाणीत सदर महिला कर्मचाऱ्याच्या खांदे, डोके व पोटाला दुखापत झाली आहे. यादरम्यान सरोज खान याचा मोठा भाऊ सरजील परवेज खान याने देखील महिला पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. यादरम्यान घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी दोघा भावांना मारहाण केल्यानंतर दोघांनी दुचाकीवरुन पळ काढला.
मात्र यावेळी दोघांनी सदर महिला पोलिस कर्मचाऱ्याला जिवेठार मारण्याची धमकी दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ शनिवार दिवसभर सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी रात्री उशिराने नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात पिडीत महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरुन संशयित सरोज परवेज खान व सरजील परवेज खान या दोघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी भादंवि कलम ३५३, ३५४, ५०९, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदा पाटील करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

कुलर वापरताना विद्युत सुरक्षेची काळजी घ्या महावितरणचे आवाहन

Next Post

गावागावात ग्रामरक्षा दलाची स्थापना करायला हवी ; प्रशांत जुवेकर

Next Post
गावागावात ग्रामरक्षा दलाची स्थापना करायला हवी ; प्रशांत जुवेकर

गावागावात ग्रामरक्षा दलाची स्थापना करायला हवी ; प्रशांत जुवेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

February 18, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 18, 2026
लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add