नंदुरबार l प्रतिनिधी
आज नंदुरबार शहरात ईद, अक्षय तृतीया व पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या अगमना दरम्यान हजारो भाविक बाहेरून नंदनागरीत दाखल झाले होते. यामुळे वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस दलामार्फत ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता.
बंदोबस्तात तैनात विद्यासरोज हॉस्पिटल समोरील चौकात एक कर्तव्यदक्ष महिला पोलीसाशी एक नेत्याच्या मुलाने शासकीय नियम धाब्यावर ठेवत या महिला पोलिसाशी हुज्जत घातली व मारहाण केली, नंतर याच्या काही नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन या आरोपीस पळवून लावले,
सूत्रा नुसार सदर महिला अधिकारीने गुन्हा नोंद करू नये म्हणून वरिष्ठ अधिकारी दबाव टाकत असल्याचे जनमानसात चर्चा आहे, याबाबत गुन्हा दाखल होतो किंवा नाही यात लोकांमध्ये संभ्रम आहे.