नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील बायपास रस्त्यावरील छत्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्त आज शिव महापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या एक दिवसीय शिव चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण तयारी पूर्णत्वास आलेली आहे. महाराष्ट्र,गुजरात व मध्य प्रदेश या तीन राज्यांतील साधारणता दीड लाख भाविकांच्या उपस्थितीच्या अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.
माजी आमदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून शहरालगत असलेल्या शहादा बायपास रस्त्यावर १२५ बेडचे सुसज्ज 25 कोटी रुपये खर्चाचे छत्रपती मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर करण्यात येत आहे. दरम्यान,शिव महापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या एक दिवसीय शिव चर्चा कार्यक्रमाचे दुपारी १२.३० आयोजन करण्यात आले आहे.
तत्पूर्वी जी.टी पाटील महाविद्यालय परिसरापासून त्यांची सकाळी १० वाजता निघणार आहे.मारुती व्यायाम शाळा, अंधारे चौक, आमदार कार्यालय, जुनी नगरपालिका चौक,स्टेशन रोड, नेहरू पुतळा मार्गे हाट दरवाजा व तेथून चंद्रकांत रघुवंशी यांच्या राम पॅलेस पर्यंत पंडित मिश्रा यांची सवाद्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
शोभायात्रेच्या अग्रभागी कलशधारी महिला
पंडित प्रदीप मिश्रा यांच्या रोड शोच्या अग्रभागी कलशधारी युवती व महिला असतील. साधारणता हजारावर मुलांच्या सहभाग असणार आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम, हर हर महादेवाच्या जयघोषित ठीक ठिकाणी रोड शो मध्ये पं.मिश्रा यांचे स्वागत केले जाणार आहे.
सायंकाळ पासूनच भाविक दाखल
बायपास रस्त्यावर छत्रपती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या प्रांगणात शिव चर्चा आयोजित करण्यात आली आहे. कथा श्रवणासाठी बाहेर गावातील शिवभक्त सायंकाळ पासूनच दाखल झालेले आहेत.
भाविकांनी काळजी घ्यावी; माजी आ.चंद्रकांत रघुवंशी
कथा प्रवचनाला येतांना भाविक भक्तांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. जे लोकं आजारी असतील त्यांनी घरी टीव्हीवर महाराजांची कथा श्रवण करावी. महिला भाविकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी महागडे दाग दागिने विधान करून येऊ नये.येतांना सोबत पाण्याची बाटली, ऊन लागू नये म्हणून टोपी अथवा रुमाल सोबत असू द्यावा. असे कथा आयोजक माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.
स्वागताचे फलक झळकले
शिव कथेला पंडित प्रदीप मिश्रा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कथेला उपस्थित राहणार असल्याने शहरात ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे फलक झळकवण्यात आलेले आहेत.धुळ्याच्या चौफुली, नवापूर चौफुली, बायपास रस्ता, नेहरू पुतळा,स्टेशन रोड, अंधारे चौकसह ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.