नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील छत्रपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल इमारतीचे उदघाटन पंडीत प्रदिप मिश्रा यांच्या हस्ते
होणार आहे. सदर कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येण्याची शक्यता असल्याने रहदारी नियमनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील रहदारीत अंशत: बदल करण्यात आले आहे.
दि.22 एप्रिल 2023 रोजी स.6 ते सायं.6 वाजे दरम्यान पंडीत प्रदिप मिश्रा यांच्या हस्ते नंदुरबार येथील छत्रपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल इमारतीचे उदघाटन कार्यक्रम असल्याने तसेच सदर कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे येण्याची शक्यता असल्याने सदर वेळी आजुबाजुच्या जिल्हयातून तसेच लगतचे गुजरात व मध्यप्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक तसेच कार्यकर्ते वाहनांनी नंदुरबार येथे येण्याची शक्यता असल्याने सदर दिवशी रहदारी नियमनाचे अनुषंगाने काही राष्ट्रीय व राज्य महामार्गामध्ये बदल करून वाहतूक वळविण्यात आली आहे.
त्यासाठी खालील नमुद राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील वाहतुक मध्ये बदल करण्यात आले आहे. दोंडाईचाकडून येणारी लहान-मोठी चारचाकी वाहने, बसेस अवजड वाहने ही चौपाळाफाटा कडून चौपाळे गावातून सरळ उमरदे रोड ओलांडून होळतर्फे हवेली मागे पुढे नंदुरबार शहराकडे शहराबाहेरील उड्डाणपुला खालून करण चौफुली मार्गे जातील. साक्री, नवापूर कडुन येणारी व शहादाकडून गुजरात राज्याकडे जाणारी वाहने देकवद येथून पाचोराबारी करणखेडा, वाका चार रस्तामार्गे शहादा, गुजरात राज्यात जातील. करण चौफुली कडुन येणारी वाहने शहराबाहेरील उड्डाण पूला खालून होळतर्फे हवेली गावातून उमदे गांव पुढे वावद मार्ग दोडाईचाकडे
तसेच साक्री कडे जाणारी वाहने नंदुरबार शहरातील धुळे चौफुली मार्ग साक्री व नवापूरकडे जातील प्रकाशा चौफुलीकडुन नंदुरबारकडे येणारी वाहने शहादामार्गे दौडाईचा व पुढे धुळे कडे जातील, वाका चार रस्ता कडुन येणारी वाहने वाका चार रस्ता ते सरळ प्रकाशा मार्ग शहादा कडे जातील. रहदारी नियमनासाठी व वाहतुकीची होणारी कोंडी टाळण्यासाठी दि. 22 एप्रिल 2023 रोजीचे सकाळी 6 ते सायं. 6 वा. पर्यंत वळविण्यात आले असल्याचे आदेशजिल्हाधिकारी यांनी दिले.सर्व नागरीकांना दि.22 एप्रिल 2023 रोजीचे सकाळी 6 ते सायं. 6
वा. पर्यंत नेमुन दिलेल्या मार्गानेच प्रवास करुन पोलीस विभागास सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.








