नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील भवरे जंगलात अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्या दोन संशयितांना वन विभागाने अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने सहा दिवसांची वन कोठडीत सुनावली आहे .
याबाबत नवापूर वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार , दि.१७ सप्टेंबर रोजी सकाळी रेंज स्टाफ नवापूर तालुक्यातील भवरे कक्ष क्रमांक ५० मध्ये गस्त करताना संशयित आरोपी सारत्या होण्या गावीत , समूवेल रिमू गावीत व इतर जण सर्व रा.भवरे ता.नवापूर हे अवैध वृक्षतोड करताना दिसले . त्यांचा पाठलाग केला असता संशयित फरार झाले . सायंकाळी साडेसात वाजता सापळा रचून त्यांच्या राहत्या घरी जावून ताब्यात घेतले . इतर दोन जण फरार असून त्यांचा तपास सुरू आहे .
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने सहा दिवसांची वन कोठडीत सुनावली आहे .
ही कारवाई नवापूरचे वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल , गस्ती पथकाचे वनक्षेत्रपाल ( शहादा ) शिवाजी रत्नपारखे , बोरझरचे वनपाल ए . एम . शेख , वडकळंबीचे वनपाल एस.एस. पाटील , वनरक्षक अशोक पावरा , दीपक पाटील , अमोल गावीत , अनिल वळवी , कमलेश वसावे , कल्पेश अहिरे , विकास शिंदे , संगीता खैरनार , लक्ष्मण पवार , भाग्यश्री पावरा , संतोष गायकवाड , पिंकी बडगुजर यांनी केली आहे .