Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात 30 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

team by team
March 29, 2023
in राज्य
0
जिल्ह्यात 30 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय, नंदुरबार व तालुकास्तरावर रविवार 30 एप्रिल,2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डि.व्ही. हरणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सर्व प्रकारचे दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात दावे, कौटुंबिक हिंसाचार, चलनक्षम दस्तऐवज प्रकरणे, किरकोळ स्वरुपाची दिवाणी प्रकरणे, भूसंपादनाशी संबंधित असणारी प्रलंबित प्रकरणे या अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहे. तर दाखलपुर्वक प्रकरणांमध्ये सर्व प्रकारचे तडजोडक्षम प्रकरणे, उदा. बँक कर्ज, पाणीपट्टी, दूरध्वनीदेयक, वीजबिल इत्यादी थकबाकी वसुलीची प्रकरणे ठेवण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांनी त्यांच्या अखत्यारीतील थकबाकी बाबतची दाखलपूर्वक प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवावयाची असल्यास जिल्ह्यातील कार्यालयांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार येथे, तर  तालुकास्तरावरील कार्यालयांनी तालुका विधी सेवा समितीकडे संपर्क साधावा. जास्तीत जास्त नागरिकांनी राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. हरणे यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

31 मार्चला मुंबई येथे विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन

Next Post

आदर्श आश्रमशाळेच्या प्रवेशासाठी 2 एप्रिल रोजी पूर्व परीक्षेचे आयोजन

Next Post
आदर्श आश्रमशाळेच्या प्रवेशासाठी  2 एप्रिल रोजी पूर्व परीक्षेचे आयोजन

आदर्श आश्रमशाळेच्या प्रवेशासाठी 2 एप्रिल रोजी पूर्व परीक्षेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add