Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विधी शाखेच्या विद्यार्थ्यांची जळगाव विद्यापीठावर धडक मोर्चा,विद्यार्थ्यांवर मधमाश्याच्या हल्ला

team by team
March 29, 2023
in शैक्षणिक
0
विधी शाखेच्या विद्यार्थ्यांची जळगाव विद्यापीठावर धडक मोर्चा,विद्यार्थ्यांवर मधमाश्याच्या हल्ला

नंदूरबार l प्रतिनिधी

 

विधी शाखेच्या विद्यार्थ्यांची क.ब.चौ.उ.म.वि. जळगाव विद्यापीठावर धडक मोर्चा काढत विधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला लावले टाळे लावले दरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर मधमाश्याच्या हल्ला केला संशयित निकाला विरोधात आंदोलन सुरु होते.

 

वारंवार निवेदन देऊन सुद्धा विद्यापीठ दखल घेत नसल्यामुळे विधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर 27 मार्च 2023 रोजी ठिय्या आंदोलन केले शांततेत आंदोलन करत असताना अचानक विद्यापीठाच्या मुख्य बिल्डिंगच्या प्रवेश द्वार वर असेले मधमाश्याच्या पोळा उडवण्यात आला आणि मधमाश्या ह्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यावर हल्ला केला. त्यामुळे आंदोलन करणारे विद्यार्थीची पळापळ झाली होती. मात्र पुन्हा काही वेळात सर्व विद्यार्थी एकत्र आले व आंदोलन सुरू ठेवले या हल्ल्यात 2 विद्यार्थी बेशुद ही पडले होते तसेच बहुसंख्य विद्यार्थी जखमी झाले.अनेक जण मधमाश्या पासून वाचन्यासाठी झाडावर चढले. सदर आंदोलन दडपण्यासाठी प्रशासनानेच हे पोळ उडवल्याचा आरोप विद्यार्थ्यानी यावेळी केले आहे, सदर या आंदोलन दरम्यान विद्यार्थ्यानी विद्यापीठाच्या मुख्य गेटला टाळे लावून आपला संताप व्यक्त केला.

 

 

 

कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एलएलबी द्वितीय, तृतीय वर्ष, बीए एल.एल.बी. द्वितीय वर्ष, व एल.एल.एम सेमिस्टर पाचव्या वर्षाची परीक्षा डिसेंबर व जनवरी 2022 – 23 या महिन्यात घेण्यात आली होती सदर परीक्षेत विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील सुमारे 80 ते 90 टक्के विद्यार्थी या परीक्षेत नापास झाले होते. तरी सदर परीक्षेच्या निकालात त्रुटी असून सदर परीक्षेच्या पेपरचे पुन्हा तपासणी करण्यात यावी अशी मागणी विद्यापीठ सलग्नित सुमारे 6 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनेक वेळा निवेदनामार्फत केली होती. परंतु सदर मागणीवर विद्यापीठातर्फे कोणतीही विचार न करण्यात आल्याने दि.27 मार्च रोजी सकाळी सकाळी 11 वाजता विद्यापीठवर ठिया आंदोलन करण्यात आले.

 

 

याप्रसंगी महाविद्यालय प्रतिनिधी म्हणून विद्यार्थी आंदोलनात कोर कमिटीचे सदस्य सम्राट सोनवणे, किशोर खलसे (गोदावरी विधि महाविद्यालय- जळगाव), निशा अग्रवाल (एस. एस. बियाणी विधि महाविद्यालय – धुळे), शुभांगी फासे (मनियार विधि महाविद्यालय – जळगाव), शुभम जैन (भंसाली) (जामिया विधि महाविद्यालय – अक्कलकुवा), मिलिंद बैसाणे, विक्रम साळुंखे पाटील (एस एस बियाणी लॉ कॉलेज धुळे) आदी सह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते
यावेळी कोर कमिटीच्ये सदस्यांना कुलगुरु व्ही.एल.माहेश्वरी यांच्या दालनात बोलवण्यात आले.

 

यावेळी त्यांना कोर कमिटीच्या सदस्यांनी निवेदन दिले. त्यात विधि शाखेच्या विद्यार्थ्यांच्या लागलेल्या त्रुटी व संशयित असलेल्या निकालाबाबत सर्व समस्या सांगण्यात आले.तसेच 48 तासात कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही तर बेमुदत महाविद्यालय बंदच्या इशारा यावेळी देण्यात आले. यावेळी कुलगुरु माहेश्वरी यांनी सांगितले की, आपली समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येणार असल्याचे सांगितले व 29 मार्च रोजी विद्यापीठ संलग्न असलेल्या सर्व विधि विद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापकांची बैठक बोलवण्यात आली. ह्या बैठकी मागच्या उद्देश् सध्या स्पष्ट नाही, मात्र विद्यार्थी हे आपल्या मागण्यावर ठाम आहे. जो पर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याच्ये यावेळी सांगण्यात आले.

 

 

यावेळी एस एस मनियार विधी महाविद्यालय- जळगाव,डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालय- जळगाव ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल विधी महाविद्यालय- धुळे , एस. एम. बियाणी विधी महाविद्यालय धुळे, एन. टी. व्ही. एस. विधी महाविद्यालय – नंदुरबार, जामिया विधी महाविद्यालय – अक्कलकुवा यासह बहुसंख्य विद्यार्थी आंदोलन वेळी हजर होते.यावेळी कायद्या सुव्यवस्थेसाठी पोलिस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी ही उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

धडाकेबाज कारवाई: नवापूर पोलीसांच्या छाप्यात 40 गॅस सिलिंडर जप्त

Next Post

31 मार्चला मुंबई येथे विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन

Next Post
31 मार्चला मुंबई येथे विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन

31 मार्चला मुंबई येथे विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026
सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

February 20, 2026
शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

February 20, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

February 20, 2026
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

February 20, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add