म्हसावद l प्रतिनिधी
भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष , ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नेताजी सुभाषचन्द्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हा संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांची निवड करण्यात आली. आदिवासी कोळी महासंघ संस्थापक अध्यक्ष माजी कैबिनेट मंत्री डॉ.दशरथ भांडे यांनी आदिवासी कोळी महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी फेर नियुक्ती केली.
प्रल्हाद सोनवणे, माजी कैबिनेट मंत्री डॉ दशरथ भांडे यांच्या मार्गदर्शनाने आदिवासी जमात बांधवांना अनुसूचित जातीचे प्रमाण, वैधता प्रमाण पत्र मिळावे तसेच आदिवासी जमात बांधवांच्या नविन पिढीच्या उज्वल भविष्यासाठी सतत निस्वार्थ कार्य करीत असतात, आदिवासी कोळी महासंघ, आदिवासी संघर्ष समितीच्या माध्यमातून आदिवासी कोळी समाजाचे विविध प्रश्न न्यायालयीन लढा असो वा रस्त्यांवरील आंदोलने , मोर्चे, तसेच मंत्री महोदय, आमदार, खासदार लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी यांच्या माध्यमातून आदिवासी जमात बांधवांना न्याय, हक्क ,अधिकार आरक्षण मिळावे त्यांचे विविध प्रश्न शासन दरबारी मांडत असतात या त्यांच्या समाज कार्यामुळे अकोला येथील बैठकीत माजी कैबिनेट मंत्री डॉ. दशरथजी भांडे यांनी प्रल्हाद सोनवणे यांची आदिवासी कोळी महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी फेर नियुक्ती करुन नियुक्ती पत्र दिले.
प्रल्हाद सोनवणे येत्या काळात प्रमुख वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाने जळगाव जिल्हासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात संघटनेची पूर्णरचना करुन आदिवासी समाज बांधवांना संघटीत करतील.








