Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर श्री.राम जन्मोत्सव समितीतर्फे रक्तदान शिबिर, ६०० रक्तदात्यांनी केले रक्तदान

team by team
March 26, 2023
in राजकीय
0
नवापूर श्री.राम जन्मोत्सव समितीतर्फे रक्तदान शिबिर, ६०० रक्तदात्यांनी केले रक्तदान

नवापूर | प्रतिनिधी

श्री राम जन्मोत्सव समिती नवापूर तर्फे भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन नवापूर शहरातील टाऊन हॉल येथे घेण्यात आला.यावेळी ६०० च्यावर रक्तदात्यांनी रक्तदान केले.

रक्तदान शिबिराचे  उद्घाटन महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्याहस्ते प्रभू श्री राम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले, याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून  वि.हि.प. नंदुरबार जिल्हा मंत्री विजयराव सोनवणे, सहमंत्री अजय कासार, तहसीलदार  मंदार कुलकर्णी , नगरपालिकेचे मुख्याधिकारी स्वप्निल मुदलवाडकर ,माजी नगराध्यक्षा हेमलता पाटील, अनिल सुदाम पाटील,माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील, मनोज अग्रवाल, राजू गावित, सौ .नितु शर्मा हे उपस्थित होते.श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष भरत गावित यांनी शहरात जन्मोत्सव निमित्त होणार्‍या विविध कार्यक्रमाची माहिती दिली व नवापूर शहरातील व तालुक्यातील नागरिकांना या उत्सवात सहभागी होण्याची विनंती केली.

मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी  उत्सवानिमित्त  असे  समाज उपयोगी सेवाकार्य  आयोजित करण्यात यावे जेणेकरून जनतेला त्याच्या लाभ होईल असे नमूद करून श्री.राम जन्मोत्सवासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या . या   रक्तदान शिबिरसाठी रक्त संकलन कामी  जिल्हा रुग्णालय नंदुरबार, जनकल्याण रक्तपेढी नंदुरबार, तथा जनक हॉस्पिटलची रक्तपेढी व्यारा  हे उपस्थित  होते.समितीच्या सर्व सदस्यांनी संपूर्ण शहरात जनजागृती करून विविध वार्डात बैठक , प्रचार रॅली काढून नागरिकांना रक्तदान करण्यास प्रेरित केले.

सायंकाळी ७ वाजेपर्यंतचालणार्‍या या शिबिरात सायंकाळी ५ वाजे पर्यंत एकूण ६०० रक्तदात्यांनी रक्तदान केले असून अजून रक्तदान सुरू आहे.विशेष बाब म्हणजे शहराच्या व नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात महिलांच्या रक्तदानासाठीची संख्या ही २०० च्यावर झाली आहे.रक्तदान शिबीर उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण टिभे,सूत्रसंचालन महेंद्र पाटील,व आभार अनिल दुसाने यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

शिंदे-फडणवीस सरकार संवेदनहिन, शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष :राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

Next Post

अक्कलकुवा येथे आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते भुमीगत गटारीचे भूमिपूजन

Next Post
अक्कलकुवा येथे आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते भुमीगत गटारीचे भूमिपूजन

अक्कलकुवा येथे आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते भुमीगत गटारीचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add