Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिंदे-फडणवीस सरकार संवेदनहिन, शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष :राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

Mahesh Patil by Mahesh Patil
March 26, 2023
in राजकीय
0
शिंदे-फडणवीस सरकार संवेदनहिन, शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष :राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

नंदुरबार | प्रतिनिधी

 

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार संवेदनहिन असुन शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे बघण्यास त्यांना वेळ नाही. अवकाळी पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झाले असतांना अधिवेशनात मदत जाहीर केली जाईल, अशा घोषणा राज्यभर मंत्री करत फिरले मात्र सरकारने शेतकर्‍यांना मदतीची घोषणा न करता पूर्ण अधिवेशन उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर टीका करण्यातच खर्ची घातल्याचं चित्र आहे. सरकार फक्त आश्वासनाचा पलीकडे काही करत नसल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

 

 

विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारी संपल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. चार दिवसाच्या या दौर्‍यात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याचे ध्येय नजरेसमोर त्यांनी ठेवले आहे.

 

 

 

आज नंदुरबार व शहादा येथे कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.स्थानिक पातळीवर प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षसंघटना वाढीवर आणि सभासद नोंदणीवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन जयंत पाटील यांनी यावेळी केले. गावागावात पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते निर्माण करण्याची गरज आहे.पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावावा. एकसंघ राहून पक्षाचे काम केल्यास त्याचा उत्तम निकाल आपल्याला मिळेल असा दृढ विश्वासही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला. सामान्य जनतेला आपल्या पक्षाकडून अनेक अपेक्षा आहेत. राज्याला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी या विश्वासाला पात्र ठरेल असे लोकोपयोगी काम करूया असे आवाहनही जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

 

 

 

दौर्‍याची सुरुवात नंदुरबार जिल्हयातील शहादा विधानसभा मतदारसंघातून झाली. शहादा येथे घेतलेल्या या आढावा बैठकीला ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे, माजी मंत्री हेमंत देशमुख, नंदुरबार जिल्हा निरीक्षक नानासाहेब महाले, नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, माजी आ.उदयसिंग पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेवाळे, युवक जिल्हाध्यक्ष मनोज महाजन, तळोदा शहराध्यक्ष योगेश मराठे, शहादा-तळोदा विद्यार्थी अध्यक्ष कुणाल पाडवी, तळोदा तालुकाध्यक्ष पुंडलिक राजपूत, शहादा तालुकाध्यक्ष माधव पाटील, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

माजी आ.चंद्रकांत रघुवंशींनी फुंकले बाजार समिती निवडणुकीचे रणशिंग

Next Post

नवापूर श्री.राम जन्मोत्सव समितीतर्फे रक्तदान शिबिर, ६०० रक्तदात्यांनी केले रक्तदान

Next Post
नवापूर श्री.राम जन्मोत्सव समितीतर्फे रक्तदान शिबिर, ६०० रक्तदात्यांनी केले रक्तदान

नवापूर श्री.राम जन्मोत्सव समितीतर्फे रक्तदान शिबिर, ६०० रक्तदात्यांनी केले रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025
डॉ.विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केले अभिनंदन

डॉ.विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केले अभिनंदन

July 2, 2025
अक्कलकुवा येथील गर्भवती महिलांना आहार कीटचे वाटप

अक्कलकुवा येथील गर्भवती महिलांना आहार कीटचे वाटप

July 2, 2025
नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

July 1, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group