नंदुरबार l प्रतिनिधी
एकीकडे सर्वप्रकारचे काळे धंदे सगळीकडे चालू असून त्यामाध्यमातून कोरोना प्रसार होत असल्याचे सरकारला जाणवत नाही. दुसरीकडे मात्र समस्त हिंदु धर्मियांचे प्रथम पुजनीय वंदनीय अराध्य दैवत श्री गणपती मूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्याला, सामुहिक आरती-पुजनाला, मिरवणुकीला मात्र बंदी घातली जात आहे. हिंदु बांधवांच्या धार्मिक श्रध्दा भावनांवर अशारितीने आघात करायला महाराष्ट्रात काय तालिबानी राजवट चालली आहे काय? असा संतप्त प्रश्न करीत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी हे आदेश तातडीने हटवावेत अशी मागणी करीत महाविकास आघाडी सरकारच्या या धोरणांचा जाहीर निषेध नोंदवला आहे.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन दिले. त्या निवेदनात म्हटले आहे की, श्री गणपतीच्या सामुहिक पुजनाला हिंदु समाजात धर्मशास्त्रीय महत्व आहे. सामुहिक आरती आणि पुजनाची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणपती उत्सवाची ती धर्मशास्त्राधारित परंपरा वृध्दींगत केली. सर्व समाज घटक संघटीत करण्याचा आदर्श त्याद्वारे घालून दिला. असे असतांना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार तो एकोपा तोडणारे आणि श्रध्दांवर आघात करणारे आदेश लागू करून अप्रत्यक्षपणे धर्मभेदाचे राजकारण करीत आहे. हे महाविकास करणारे नव्हे तर महाभकास धोरण राबवणारे सरकार असल्याचा परिचय देत आहे. याचा आम्ही तीव्र धिक्कार करतो.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, नंदुरबार मानाचा दादा व बाबा गणपतींची दीडशे वर्षांची परंपरा खंडित केली गेली, कार्यकर्ते मोजक्या संख्येने सॅनिटाईजेशन व अंतर राखण्याचे नियम पाळायला तयार असतांनाही तापीकाठावर जाण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला, शहाद्यात गणेश मंडळांचे वाजंत्री साहित्य जप्त करीत अन्याय केला गेला, हे सर्व पाहता तालीबानी राज्य चालू आहे का असा प्रश्न पडतो. नंदुरबारला देवाच्या कृपेने वाहत्या पाण्याचे भले मोठे पात्र तापी नदीच्या रुपाने लाभलेले आहे. असे असतांना मोठ्या मंडळांच्याही मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करायला लावणे, सामुहिक आरती पुजनाला बंदी घालणे, हे सर्व दळभद्रीपणाचे लक्षण असून हिंदु धर्मियांना जाणीवपूर्वक लक्ष बनवणारे आहे. याचा धिक्कार करतो आणि ताबडबतोब हे आदेश मागे घेतले जावेत, अशी मागणी करतो. कोरोना प्रसाराचा आणि विषाणू संक्रमणाचा सर्वाधिक धोका असतांनाही गर्दी करणारे आणि वाहतूकीशी संबंधीत असलेले सर्वप्रकारचे काळे धंदे राजरोस चालू आहेत. कोरोना प्रसाराचा आणि विषाणू संक्रमणाचा फैलाव त्या माध्यमातून होत असल्याचे शासनाला जाणवत नाही आणि त्याला खरोखरचा आळा घातला जात नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे. त्या उलट मंदिरांमधे भाविक एकत्र आल्यास, आराध्य दैवत श्री गणपतीच्या पुजनाला भाविक एकत्र आल्यास कोरोनाचा फैलाव होईल असे शासकीय यंत्रणांना वाटते. हा निव्वळ ढोंगीपणा असून जाणीवपूर्व धार्मिक भेदभाव करण्यासाठी लादलेले
अन्याय कारक धोरण आहे. यामुळेच समस्त संतप्त हिंदु बांधवांमधे संतापाची व असंतोषाची लाट आहे. दुखावलेल्या त्या समस्त नागरिकांच्या वतीने शासनाला आम्ही ईषारा देत आहोत की, महाभकास आघाडी सरकारने हे गृहखात्याचा गैरवापर करून गणेश विसर्जना संदर्भात काढलेले परिपत्रक रद्द न केल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल. असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिलेला आहे.