नंदूरबार l प्रतिनिधी
पश्चिम रेल्वेच्या उधना रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म चे कामासाठी ४ दिवसांचा रेल्वे ब्लॉक असल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

उधना येथे रेल्वे ब्लॉक 3 मार्च रोजी सकाळी 9 वाजेपासून 6 मार्च रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत चालेल. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. प्रवाशांनी आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी, रेल्वे ब्लॉकच्या दिवशी उधना स्थानकावर नियोजित थांबा असलेल्या गाड्यांसह कोणतीही पॅसेंजर ट्रेन उधना स्थानकावर थांबवली जाणार नाही.








