नंदुरबार l प्रतिनिधी
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन १० ते १७ वर्ष वयोगटातील मुलांसाठी दरवर्षी होत असते. यंदा लहान गटातून (१० ते १४) पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या शौर्या समर्थ आणि मृणाली चव्हाण यांच्या डेंग्यूचा डासावरील पपई पासून बनविलेले औषध या प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. तसेच ह्या दोघा बाल वैज्ञानिकांनी दि.२७ ते ३१ जानेवारी २०२३ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्री बाल विज्ञान परिषदेत पोदार इंटरनॅशनल स्कूल नंदुरबार चे प्रतिनिधित्व करीत शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन १० ते १७ वर्ष वयोगटातील मुलांसाठी दरवर्षी होत असते. या परिषदेत दोन मुलांच्या गटातर्फे दिलेल्या विषयावर लघुसंशोधन प्रकल्प सादर केले जातात.शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने राज्य स्तरावर जिज्ञासा ट्रस्ट ठाणे जिल्हा स्तरावर विज्ञान पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या वात्सल्य सेवा समितीतर्फे हा उपक्रम राबविला जातो.
पोदार इंटरनॅशनल स्कूलतर्फे समितीतर्फे भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या आपल्या जिल्ह्यातून बाल वैज्ञानिक तयार व्हावे,संशोधनवृत्ती लहानवयातच योग्य पद्धतीने विकसित व्हावी, यासाठी शाळा दरवर्षी नानाविध उपक्रम हाती घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असते. पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या दोन्हीही विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला प्रोत्साहन मिळावे यासाठी शाळेतर्फे विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन देण्यात येते. एकंदरीत या सर्व प्रयत्नातून १७ प्रकल्पांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.
लहान गटातून (१० ते १४) पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या कु.शौर्या समर्थ आणि मृणाली चव्हाण यांच्या डेंग्यूचा डासावरील पपई पासून बनविलेले औषध या प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशासाठी शाळेचे प्राचार्य मुकुंद इंगळे यांनी तत्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.








