Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संकल्पना समजवणारे शिक्षण द्यावे: मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शिक्षण पुरस्काराचे वितरण

team by team
September 15, 2021
in शैक्षणिक
0
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संकल्पना समजवणारे शिक्षण द्यावे: मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शिक्षण पुरस्काराचे वितरण

नंदुरबार l प्रतिनिधी
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संकल्पना समजवणारे शिक्षण द्यावे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हा शिक्षण पुरस्काराचे वितरण प्रसंगी केले.

नंदुरबार येथील जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षण विभाग , जिल्हा परिषद , नंदुरबार अंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आला. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात शिक्षकांना मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांना संकल्पना समजवून सांगणे आवश्यक असल्याचेतसेच केवळ माहिती देणारे शिक्षण न देता त्या माहिती मागीलसंकल्पना स्पष्ट करुन सांगणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले . विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट असल्यास प्राप्त ज्ञानाचा वापर विद्यार्थी त्यांच्या जीवनात करतील आणि यातूनचसमाजोपयोगी विद्यार्थी घडून राष्ट्रनिर्माणास हातभार लागेल असेही त्यांनी सांगीतले.याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ , प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी , माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम , प्राथमिक उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे , डॉ.युनूस पठाण उपस्थित होते. यावेळी जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मानचिन्ह,शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. त्यात नंदुरबार तालुक्यातून जि.प.शाळा,रनाळे खुर्द शाळेचे शिक्षक पंकज गोरख भदाणे , नवापूर तालुक्यातून जि.प.शाळा , धुडीपाडा शाळेचे शिक्षक मदन श्रीधरराव मुंढे ,शहादा तालुक्यातून जि.प.कन्या शाळा , प्रकाशाचे शिक्षक रविंद्र भाईदास पाटील , तळोदा तालुक्यातून जि.प . शाळा , रेवानगर पुनर्व.क्र.3 चे शिक्षक हेमंत रामाठाकरे , अक्कलकुवा तालुक्यातून जि.प.शाळा खटकुवा चे शिक्षक भरत कमजी तडवी , धडगांव तालुक्यातून जि.प.शाळा , कुंभारपाडा शाळेचे शिक्षकदिनकर बहादूर पावरा तसेच महिला विशेष पुरस्कार अंतर्गत जि.प. शाळा , राजापूर तालुका नंदुरबार शाळेच्या शिक्षिका रोहीणी दिलीप बाविस्कर यांना पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनीकेले.उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ , माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम , प्राथमिक उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन किरण दाभाडे यांनीकेले . याप्रसंगी रांगोळी रेखाटनकरणा-या एस.ए.मिशन हायस्कुलच्या विद्यार्थीनी , गीतगायनसादरकरणा – या श्रॉफहायस्कुलच्या विद्यार्थीनी , रिमोटद्वारे दिपप्रज्वलन तसेच प्रतिमापूजन उपक्रमसाकारणारे एकलव्य हाॅयस्कुलचे शिक्षक मिलींद वडनगरे तसेच सुत्रसंचलनकरणारे शिक्षक किरण दाभाडे यांचा देखील यथोचित सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे औचित्य साधुन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांना रोटरी क्लब , नंदनगरी यांचे मार्फत गुणवंत अधिकारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण,प्राथमिक शिक्षण विभागाचे सुनिल गिरी , मयुर वाणी , प्रशांत पवार , रविंद्र बच्छाव यांनी परिश्रम घेतले.यावेळी प्राथमिक शिक्षक संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.कोरोना-१९ नियमांचे काटेकोरपणे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रकाशा येथे तापी पात्रात वाहून गेलेल्या राज सामूद्रेचा मृतदेह दोन दिवसानंतर सापडला

Next Post

खापर येथे साडे तेवीस लाखाच्या अवैध विदेशी मद्यासह, ३८ लाखाचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add