Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यात २५ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

team by team
February 21, 2023
in राज्य
0
राज्यात २५ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर  l

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना व उपक्रम आखून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न केले जात असून 25 लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी केले.

 

कणेरी मठ येथे 20 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. समारंभास शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भय्याजी जोशी, खासदार सर्वश्री धनंजय महाडिक, धैर्यशील माने, संजय मंडलिक, कर्नाटकचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार सर्वश्री प्रकाश आवाडे, प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील- यड्रावकर, महेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. त्यामुळे भविष्यात सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. गट शेती, क्लस्टर बरोबरच नैसर्गिक शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी शासनामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. भारत हा कृषिप्रधान देश आहे. नदीला, मातीला माय मानणारी आपली संस्कृती असून या संस्कृतीचे जतन आणि रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण व संस्कृती रक्षणाची चळवळ पुन्हा जोमाने सुरु होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

विकास योजना व प्रकल्प राबवताना पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम केले जात असून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर 33 लाख झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. आपले शासन सर्वसामान्यांचे शासन असून शासनाने घेतलेले निर्णय लोकाभिमुख आहेत. यास केंद्र शासनाचेही सर्व सहकार्य असून केंद्राकडून सर्व प्रस्ताव मंजूर होत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी काळाची गरज ओळखून सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाची संकल्पना मांडल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वामीजींना धन्यवाद दिले. अध्यात्म शास्त्र आणि नैसर्गिक तत्त्वाची सांगड घालून सिद्धगिरी मठावर विविध उपक्रम राबविले जात आहेत. हा लोकोत्सव मठाचा किंवा शासनाचा नसून प्रत्येकाचा आहे. या संकल्पनेत प्रत्येकाने सहभाग व योगदान दिल्यामुळेच हा लोकोत्सव यशस्वी होत आहे. पर्यावरणाचा संदेश देणारा हा लोकोत्सव चळवळ व्हावी व हा उत्सव घराघरात पोहोचावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

अपारंपरिक स्त्रोतातून ऊर्जा उत्पादन वाढवण्यावर भर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पर्यावरणाचे रक्षण व प्रदूषण मुक्तीसाठी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतातून ऊर्जा उत्पादन वाढवण्यावर शासनाने भर दिला आहे. ग्रीन हायड्रोजन, सोलार एनर्जी असे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. या प्रकल्पातून दहा ते बारा हजार मेगावॅट वीज उपलब्ध होईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

पर्यावरणाच्या विनाशाने अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने आपली जीवनशैली बदलायला हवी, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण रक्षणाचा संदेश सर्वदूर पोहोचेल. आपल्या संस्कृतीमध्ये नदीला माता आणि निसर्गाला ईश्वर मानले जात असून पर्यावरण रक्षणाचे शाश्वत विचार प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे.

कणेरी मठ येथे काडसिद्धेश्वर स्वामीजींनी शेतीत प्रयोग केले. पर्यावरणपूरक शेती बनवली. कणेरी मठ मोठे ज्ञानाचे भंडार असून हे ज्ञान समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव राज्याच्या अन्य शहरात आयोजित करून पंचमहाभूतांचे संवर्धन करण्याबाबत व्यापक काम होणे गरजेचे आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी काडसिद्धेश्वर स्वामीजींनी वेगवेगळ्या कल्पना राबविल्या आहेत. त्यांच्या या कल्पना भविष्यात पर्यावरण रक्षणासाठी मैलाचा दगड ठरतील.

काडसिद्धेश्वर स्वामीजींनी विषमुक्त शेती करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग राबवले असल्याचे सांगून या महोत्सवात उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपण स्वागत करतो, असे पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले.

श्री. जोशी म्हणाले, या लोकोत्सवातून देण्यात येत असलेला पर्यावरण रक्षण आणि शांतीचा संदेश विश्वभर पोहोचेल.

पर्यावरण संवर्धनाविषयी ‘जाणू या पंचमहाभूतांचे महत्त्व जपू या त्यांचे अस्तित्व’ हा संदेश जगभर देऊया, असे आवाहन काडसिद्धेश्वर स्वामीजींनी यावेळी केले. ते म्हणाले,  आज पंचमहाभूतांचा समतोल ढासळला असल्याने यामध्ये असंतुलन निर्माण झाले आहे. यासाठी ‘पर्यावरण रक्षणाची स्वतः पासून सुरुवात करुया,  निसर्गाची हानी थांबवू या व पर्यावरण रक्षण हाच परमार्थ समजू या’, असे आवाहन त्यांनी केले. कणेरी मठ येथे वेस्ट पासून बेस्ट बनवण्यासाठी नवीन स्टार्टअप सुरु करण्याचा मानस असल्याचे स्वामीजी यांनी यावेळी सांगितले. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात शासनाच्या प्रत्येक विभागाने आपले योगदान दिल्याबद्दल त्यांनी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाचे आभार मानले

या समारंभात ‘सुमंगल विचार संपदा’ या पुस्तिकेचे प्रकाशन आणि कापडी पिशव्याचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

समारंभास पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

सातासमुद्रापार शिवप्रेम पोहचवणाऱ्या मराठी तरुणांचं कौतुक

Next Post

आजाराने बेशुध्द अनोळखीचा उपचारादरम्यान मृत्यू, मयताची ओळख पटविण्याचे शहादा पोलिसांचे आवाहन

Next Post
पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

आजाराने बेशुध्द अनोळखीचा उपचारादरम्यान मृत्यू, मयताची ओळख पटविण्याचे शहादा पोलिसांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add