Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अरे व्वा: संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात श्रीरामपूर ग्रामपंचपात विभागस्तरावर द्वितीय

team by team
February 20, 2023
in राज्य
0
अरे व्वा: संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात श्रीरामपूर ग्रामपंचपात विभागस्तरावर द्वितीय

नंदुरबार l प्रतिनिधी-

 

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2020-21 व 2021-22 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत श्रीरामपूर ता. नंदुरबार या ग्रामपंचायतीस विभागस्तरीय द्वितीय क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे .

 

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2020-21 व 2021-22 अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत व मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीची जिल्हास्तरिय समितीने तपासणी केली होती . या तपासणीत जिल्ह्यात प्रथम आलेल्या बामखेडा त. त. ता. शहादा व द्वितीय आलेल्या श्रीरामपूर ता. नंदुरबार या ग्रामपंचायतीची विभागस्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेकरीता निवड झाली होती .

 

 

विभागस्तरावरील विभागीय आयुक्त कार्यालय नाशिकचे उपायुक्त (विकास) मनोजकुमार चौधर यांच्या अध्यक्षतेखालील त्री सदस्यीय समितीने या ग्रामपंचायतीची तपासणी केली होती . या समितीत विस्तार अधिकारी अनिल राणे , दीपक मोरे यांचा समावेश होता. यावेळी समितीने शाळा , अंगणवाडी , सखी प्रेरणा भवन , हॅण्ड वाश स्टेशन , फुलपाखरू गार्डन , पिण्याचे पाण्याचे स्त्रोत , गोबर गॅस घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन , स्माशनभूमी आदी कामांची पाहणी केली होती .

 

 

तपासणी समितीने प्रदान केलेल्या गुणांच्या आधारे नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नुकताच विभागस्तरीय निकाल जाहीर केला असून यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत श्रीरामपूर ता. जि . नंदुरबार या ग्रामपंचायतीस दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर केले आहे . स्पर्धेत बोराडी ता. शिरपूर जि. धुळे यांना प्रथम तर गनेगाव ता . राहुरी जि . अहमदनगर यांना तृतीय क्रमांक दिला आहे . श्रीरामपूर ग्रामपंचायतीस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत अंतर्गत विभागस्तरावरून आठ लक्ष रुपयांचे रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

 

ग्रामपंचायतीस मिळालेल्या या पुरस्काराबद्दल जिल्हा परिषेदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत उपाध्यक्ष सुहास नाईक , मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे , सर्व सन्मा . सभापती , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार , प्रकल्प संचालक ( जि . ग्रा . वि . अ.) राजेंद्र पी पाटील , जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक जयवंत उगले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील , नंदुरबार पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जयवंत उगले यांनी सरपंच यशवंत गांगुर्डे,उपसरपंच नीलेश अहिरे , ग्रामसेविका रूपाली देवरे ,माजी सरपंच शत्रुघ्न गांगुर्डे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ तसेच फिनीश सोसायटी , डी. सी. एस . व बायफ या सामाजिक संस्थांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तिन राज्यात मोटार सायकल चोरी करणारी टोळी झाली जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, आठ दुचाकी जप्त

Next Post

सातासमुद्रापार शिवप्रेम पोहचवणाऱ्या मराठी तरुणांचं कौतुक

Next Post
नंदुरबारात शिवजयंती निमित्त उद्या आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे भव्य लेझर शो

सातासमुद्रापार शिवप्रेम पोहचवणाऱ्या मराठी तरुणांचं कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add