नंदूरबार l प्रतिनिधी
सरदार सरोवरामुळे बाधित झालेल्या गावांचा प्रश्न आजही कायम आहे. अतिदुर्गम भागातील सावर्यादिगरसह विविध परिसरातील गावे संपर्क क्षेत्राच्या बाहेर जावू नये यासाठी सन २००५ मध्ये सावर्यादिगर टापू परिसर समितीचे अध्यक्ष सतिष भिंगारे यांनी या परिसरात पूलाचे काम सुचविले होते. पुर्नवसन किचकट प्रक्रिया असल्याने यात अधिकचा वेळ जाणार होता. यामुळे वर्षभरात येथील रहिवाशांच्या सोयीसाठी बनविण्यात येणारा पूल आज १८ वर्ष उलटूनदेखील पुर्ण न झाल्याने सतिष भिगांरे यांनी नाराजी व्यक्त केली दरम्यान, याप्रसंगी स्थानिकांनी समस्यांचा पाढा वाचत पूर्ण झालेला नाही. आता आम्हाला पूल नको, आमचेही पुनर्वसन करा, अशी मागणी केली.
धडगांव तालुक्यातील सावर्या दिगर व परिसरातील सादरी, भमाणे, उडद्या, भादल ही गावे सरदार सरोवरमुळे संपर्क क्षेत्राच्या बाहेर जातात. यामुळे येथील रहिवाशांनी पाणी वाढल्यामुळे मगरींपासून मनुष्य व पाळीव प्राण्यांना धोका वन्य प्राण्यांकडूनही धोका होण्याची शक्यता होती. तर दुसर्या बाजूला मुळ गावातून पुनवर्सन करणे शक्य नसल्याने गावात आरोग्य, शिक्षण, पाणी व दळणवळणासाठी
रस्ता व पूल बनवून दिला तर प्रश्न सुटेल व हे काम एका वर्षात होणे शक्य होते. यामुळे सन २००५ मध्ये सतिष भिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने पूल बांधण्याचे सूचविले होते. यास आता १८ वर्षे उलटूनदेखील पूलाचे काम झाले नाही. सन २०१७-१८ मध्ये इयत्ता ७ वीत शिकणारी सपना वादर्या पावरा हिचा डुनगीतुन जात असताना मृत्यू झाला. बर्याच वेळा आंदोलन झाले, पत्रव्यवहार झाले, वरिष्ठ अधिकार्यांनी या पुलाला भेट दिली. परंतु पूल आजही पुर्ण झालेला नाही.

दरम्यान, सतिष भिंगारे नर्मदा जीवन शाळा बालमेळ्यानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात आले असता त्यांनी मध्य प्रदेशच्या बुडीत क्षेत्राचा दौरा केला. याप्रसंगी खार्या, भादल येथील जीवन शाळेला भेट देऊन, बोटीने सावर्यादिगर येथे पोहोचले. सावर्यादिगर येथे नर्मदा बचाओ आंदोलनाचे मान्या पावरा, डेकल्या पावरा, गुलाबसिंग पावरा, दिलीप पावरा (सरपंच), रोहिदास पावरा, विरसिंग पावरा, रुमाल्या पावरा, वादर्या पावरा, सियाराम पाडवी व चेतन साळवे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी दळणासाठी उन्हाळ्यात पाण येथील ग्रामस्थांनी समस्यांचा पाडाच श्री. भिंगारे यांच्यासमोर वाचला. यात मान्या पावरा यांनी आमचे पुनर्वसन करा अशी मागणी तेव्हाच होती.
शासनाने पूल न केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. रोहिदास पावरा यांनी आम्हाला असं वाटते की आम्ही भारताचे नागरिकच नाहीत म्हणून सरकार अशी वागणूक देत आहे की काय? असे सांगत खंत व्यक्त केली. सरपंच दिलीप पावरा यांनी सांगितले की, आम्ही पिढ्यानपिढ्या येथे राहतो.आमच्या गावचे वनाधिकार अंतर्गत ३३८ दावे दाखल आहेत. परंतु फक्त आठच दावे पात्र झाले. आमच्या गावातील पाटीलपाडा बुडितात जात असल्याने तेथील कुटुंबाचे जमिनीला जमीन देऊन पुनर्वसन झाले. तसेच १२ पाड्यांपैकी आजही अवघ्या दोनच पाड्यांमध्ये वीज पोहचली आहे. पाण्याचे हातपंप बरेच बंद आहेत. जि.प. शाळेत २ शिक्षक होते. त्यातील एक निवृत्त झाले तर दुसरे कधी तरी येत असल्याचे सांगण्यात आले. दळणवळणासाठी उन्हाळ्यात पाणी असते तेव्हा नावेतून व पाणी ओसरल्यावर चिखलातून पाय रुतवत जावे लागते. आरोग्य सुविधा मिळत नाही. विकास विभागाने पावसाळ्यात येण्याजाण्यासाठी बार्ज ठेवली होती. ती गेल्या दीड महिन्यापासून नाही. त्यामुळे आता आम्हाला पूल नको रस्ता नको. आमचेही पुनर्वसन व्हायला पाहिजे अशी आमची मागणी करण्यात आली. यावेळी श्री. भिंगारे यांनी तात्काळ येथील समस्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.








