म्हसावद l प्रतिनिधी
तोरणमाळ येथील श्री.गोरक्षनाथ महाराज यांची महाशिवरात्री च्या दिवसापासून सुरु झाली ही यात्रा तीन दिवस असल्याने भाविकांनी श्री. गोरक्षनाथ महाराज यांचे दर्शन घेऊन रोट चा प्रसाद घेऊन परतले ही यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडला नसून शांततेत व उत्साहात पार पडली.

महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे पासून भाविकांनी दर्शनासाठी रांगारांग लागल्या होत्या.तसेच नवस फेडण्यासाठी येत असतात याठिकाणी मध्यप्रदेशातील नेमाळ भक्तजन मोठ्या संख्येने रात्रीपासून मुक्काम या राहून जागरण करतात .येथे डाळधळपे यांचे नैवैद्य तयार करून प्रसाद स्वरूपात खात असतात नेमाली स्त्री व पुरुष यांच्या एकरंगी पेहराव यात्रेत आकर्षण ठरत होते.याच दिवशी दुपारी गोरक्षनाथ महाराज यांच्या पालखी ची भव्य मिरवणूक वाजतगाजत काढण्यात आली होती. त्यानंतर पूजापाठ करून मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

यात्रेत परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने येत असतात याठिकाणी आदिवासी सांस्कृतिक साहीत्य सह शिबली,रंगीबिरंगी घोडे,तिरकमान, भांडीउपोयोगी साहित्य,जडीबुटी आदी वस्तू घेत असतात.सव्वामन रोट तयार करण्यासाठी महंत बालयोगी त्रिशूलनाथ महाराज,पोलिस पाटील ओलसिंग नाईक,सुक्करसिंग नाईक,अर्जुन नाईक,माजी सरपंच पहाडसिंग चौधरी, केवज्या नाईक,नरसिंग चौधरी, जीवन रावताळे आदींनी सहकार्य केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. शेलार व उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात आली.यात्रेत अनुचित प्रकार घडू नये म्हणून म्हसावद ठाण्याचे पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार ,सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप,उपनिरीक्षक आरव, तोरणमाळ दुरक्षेत्र चे पोलिस हवालदार चंदू साबळे,छोटूलाल पावरा,नाईक योगेश निकम,सहायक उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण, घनश्याम सूर्यवंशी,पोलिस कर्मचारी ६१, होमगार्ड ४१ व राज्य राखीव पोलिस दल यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.








