प्रकाशा l प्रतिनिधी
कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासनाच्या सूचनेनुसार प्रकाशात साद्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
कोरोना महामारी मूळे व शासनाने घालून दिलेल्या निर्बंध मुळे पाच दिवसांचा गणपतीचे विसर्जन करण्यात आले. काही गणपती मंडळांनी सामाजिक उपक्रम हाती घेतले होते, सोनार गल्लीच्या राजा, गांधी चौक मधला दादा गणपती मंडळ,जयश्रीराम गणेश मंडळ आदी मंडळांनी सम प्रमाणात वाजंत्री लावून तरुणांनी नाचण्याचा आनंद लुटला,यात विसर्जन मिरवणुकीत महिला वर्ग,व तरुणी यांचा अधिक सहभाग दिसून आला.सर्व गणपती शासनाने नेमून दिलेल्या गौतमेश्वर मंदिर गोमाई नदीचा तीरावर करण्यात आली होती, परिसरातील गावातील रात्री उशिरा परंत विसर्जन सुरू होते.