Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे राष्ट्रवादीतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रम

team by team
February 5, 2023
in राजकीय
0
नंदुरबार येथे राष्ट्रवादीतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रम

नंदूरबार | प्रतिनिधी

 

नंदुरबार येथे राष्ट्रवादीतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला असुन बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

 

 

 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रभावी, प्रगल्भ, तरुण, पुरोगामी विचारांसाठी संकल्पना मांडली होती. या करिता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी, संघटनेतील सर्वच फ्रंटल सेलच्या पदाधिकारी यांनी एकत्र बैठक आयोजित करून सर्वानी बैठकीला उपस्थित राहुन,या बैठकीमध्ये, देशाच्या, राज्याच्या जिल्ह्याच्या, तालुक्याच्या, सामाजिक, आर्थिक, राजकीय जडणघडणीची चर्चा या बैठकीत प्रामुख्याने होणे गरजेचे आहे.

 

 

याच आवाहनाला प्रतिसाद देत  फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या शनिवारी नंदुरबार येथील राष्ट्रवादी भवन जिल्हा कार्यालय येथे एक तास राष्ट्रवादीसाठी या बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी केले होते. या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी प्रभागातील असणार्‍या नागरिकांच्या समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली व सूचना मांडण्यात आल्या.यावेळी  नरेंद्र मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. देशात वाढती महागाई, बेरोजगारी देशाची आर्थिक परिस्थिती विदारक असून देश आर्थिक मंदीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे, वाढत्या महागाईवर लोकसभेत विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारल्यावर बोलु दिले जात नाही.राज्याचे मंत्रिमंडळला साथ महिने पूर्ण झाले तरी, महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार नाही. या शिंदे- फडणवीस सरकारने राज्यातील जनतेला वार्‍यावर सोडले आहे. राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित असताना त्याकडे सोयीने दुर्लक्ष केले जात आहे असे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी सांगीतले.

 

 

या बैठकीस राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव ऍड.राऊ् मोरे, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी, विद्यार्थी सेल जिल्हाध्यक्ष बबलु कदमबांडे, सोशल मिडिया सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मोरे, सेवा दल जिल्हाध्यक्ष रविंद्र जावरे, युवक शहराध्यक्ष लल्ला मराठे, युवक तालुकाध्यक्ष दिनेश माळी, ओबीसी जिल्हा समन्वयक निलेश चौधरी, शहर उपाध्यक्ष राजा ठाकरे, विद्यार्थी सेल शहराध्यक्ष जयेश मराठे, धनराज बच्छाव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

मांडवी खुर्द येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

Next Post

नंदूरबार येथील खून प्रकरणी तरुणाला न्यायालयाने  सुनावण्याली पाच दिवसांची पोलीस कोठडी

Next Post
नंदूरबार येथे धारधार शस्त्राने तरुणाचा झाला खून, तणावाचे वातावरण

नंदूरबार येथील खून प्रकरणी तरुणाला न्यायालयाने  सुनावण्याली पाच दिवसांची पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026
नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

April 1, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

April 1, 2026
तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add