चिनोदा.ता.तळोदा । वार्ताहर
तळोदा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे उपभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ यांना तळोदा एम.एस.सी.बी.मागील बायापास रस्त्यावरील विद्युत खांबावर लोंबकलेल्या विद्युत तारांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच तळोदा शहरातील मेन रोड वरील रस्त्याचे काम सुरू असल्याने याच बायपास रस्त्यावरून वर्दळ सुरू असून शाळकरी मुले-मुली याच मार्गाने ये-जा करीत असतात. तरी लवकरात लवकर ह्या लोंबकलेल्या विद्युत तारांची उपाययोजना करण्यात यावी यासाठी उपभियंता यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी शराध्यक्ष योगेश मराठे, सामाजिक कार्यकर्ता संदीप परदेशी, शहादा- तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी, खजिनदार धर्मराज पवार, शहर उपाध्यक्ष गणेश पाडवी, अल्प.स.शहर अध्यक्ष आदिल शेख, सहसंघटक मुकेश पाडवी, रविंद्र पाडवी, प्रकाश पाडवी उपस्थित होते.








