Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार रेल्वे स्टेशनवर गदारोळात धावली माणुसकीची एक्सप्रेस

team by team
January 31, 2023
in राज्य
0
नंदुरबार रेल्वे स्टेशनवर गदारोळात धावली माणुसकीची एक्सप्रेस

नंदुरबार | प्रतिनिधी

आज दि.३१ जानेवारी रोजी दुपारी नवजीवन एक्सप्रेस ट्रेन (क्र.१२६५५) मधुन जाणार्‍या एका प्रवाशाला नंदुरबार जवळ अचानक हृदयविकाराचा झटका आला होता़.गाडी नंदुरबार रेल्वे स्थानकावर पोहचताच रेल्वे पोलीसांनी तात्काळ धाव घेत रुग्णवाहिकेला बोलावून रुग्णाला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने रुग्णाचा जीव वाचला.नंदुरबार रेल्वे पोलीसांनी माणूसकीचे दर्शन घडविल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, आज दि.३१ जानेवारी रोजी दुपारी नवजीवन एक्सप्रेस ट्रेन (क्र.१२६५५) मध्ये जनरल बोगीत श्रीनिवास नरसिया कस्तुरी(वय ४८,रा.उधना,सुरत) हे पत्नी तेजस्वीनी व मुलगी लक्ष्मी यांच्यासोबत वारंगल ते सुरत प्रवास करत असतांना प्रवास करत होते. नंदुरबार रेल्वेस्थानक जवळ येत असतांना अचानक श्रीनिवास कस्तूरी यांच्या छातीत कळा येवू लागल्या.

त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे माहिती मिळताच रेल्वेतील अधिकार्‍यांनी तात्काळ स्टेशन मास्तर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.याबाबत नंदुरबारचे स्टेशन मास्तर यांनी रेल्वे पोलीसांना कळविताच गाडी येण्याआधी रेल्वे पोलीसांनी प्लॅटफार्मवर धाव घेतली.रुग्णवाहिकेला तात्काळ पाचारण करण्यात आले.

पोलीस हवालदार प्रकाश गोसावी, रवी पाटील व पोलीस नाईक विशाल कातीलकर यांनी श्रीनिवास कस्तूरी यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नेले.वेळीच रुग्णालयात नेल्याने श्री.कस्तुरी यांचा जीव वाचला.यामुळे श्रीनिवास यांच्या पत्नी तेजस्वीनी व मुलगी लक्ष्मी यांनी पोलीसांना धन्यवाद दिलेत.दरम्यान,रेल्वे पोलीसांनी माणूसकीचे दर्शन घडविल्याने त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

Big Breking: महाराष्ट्र – गुजरात सीमेवर चार पैकी एक बिबट्या जेरबंद

Next Post

ढेकवद ते नंदूरबार रेल्वे क्रॉसिंग गेट 88 मार्गावरील वाहतूक या तारखेपर्यंत बंद

Next Post
ढेकवद ते नंदूरबार रेल्वे क्रॉसिंग गेट 88 मार्गावरील वाहतूक या तारखेपर्यंत बंद

ढेकवद ते नंदूरबार रेल्वे क्रॉसिंग गेट 88 मार्गावरील वाहतूक या तारखेपर्यंत बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add