Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

युवकांनी मुख्य प्रवाहात येऊन राजकारणात सक्रिय व्हावे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरेंचे युवकांना आवाहन, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप

team by team
September 13, 2021
in राजकीय
0
युवकांनी मुख्य प्रवाहात येऊन राजकारणात सक्रिय व्हावे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरेंचे युवकांना आवाहन, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप
नंदुरबार l प्रतिनिधी
तरुणाई म्हणजे सळसळतं रक्त असतं. त्यांना योग्य दिशा मिळाली तर आयुष्याचं सोनं होईल. तरुणांनी पूर्ण ताकदीनिशी राष्ट्रवादीच्या मागे उभे राहून सक्रिय राजकारणात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत दिलीपराव मोरे यांनी केले.
नंदुरबार येथे रविवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी युवक काँग्रेस व विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी डॉ.अभिजित मोरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा हा एकमेव पक्ष आहे की तो सर्वसामान्यांना न्याय देऊ शकतो. पक्षात कुठलीही वशिलेबाजी चालत नाही. पक्षातील आमदार राष्ट्रवादीला सोडून गेले तरी पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी राज्यातील सरकार बनविले. जे कोणीच करू शकत नाहीये ते फक्त शरद पवार करू शकतात.
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, युवा नेते ॲड राऊ मोरे,जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील,चिटणीस जितेंद्र कोकणी,शहराध्यक्ष नितिन जगताप,तालुकाध्यक्ष प्रदिप पाटील,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अॅड अश्विनी जोशी,डाॅक्टर सेल जिल्हाध्यक्ष डाॅ.नितिन पवार,जेष्ठ सदस्य डाॅ.जगदिश मराठे,विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष बबलु कदमबाडे,सोशल मिडीया सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मोरे,सेवादल जिल्हाध्यक्ष रविंद्र जावरे,युवक शहराध्यक्ष लल्ला पैलवान,युवक तालुकाध्यक्ष सुरेश वळवी,शहर उपाध्यक्ष राजा ठाकरे,पंकज पाटील,जगदिश माळी,रुपेश जगताप,मिलिंद जाधव,निलेश चौधरी,हेमंत बिरारे आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन युवक शहराध्यक्ष लल्ला मराठे यांनी केले.
राजकारणात उमेद हरु नका
जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे पुढे म्हणाले,राजकारणात आल्यावर युवकांना दाबण्याचा प्रयत्न होत असतो. परंतु, युवकांनी राजकारणात उमेद हारायची नसते नसते. भरारी घ्यायची असते. युवकांनी मुख्य प्रवाहात येत राजकारणात सक्रिय सहभाग व्हावे.
यांची झाली नियुक्ती
युवक शहर कार्याध्यक्ष हाशिम अनिस शहा, संघटक जितेंद्र मंगु ठाकरे, सरचिटणीस अमोल पिंपळे,उपाध्यक्ष   समिर रहिम बागवान,सदस्यपदी संजय मराठे यांची तर युवक तालुका कार्याध्यक्षपदी प्रमोद महाजन तसेच
विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी डाॅ.जगदिश चौधरी,शहराध्यक्ष जयेश मोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना नियुक्तीचे पत्र जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत दिलीपराव मोरे यांच्या हस्ते देण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर, मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता लागू

Next Post
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर, मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add