नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील महिला महाविद्यालयाचे रा.से.यो विभागाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर चौपाळे येथे सुरू आहे,
शिबीरा दरम्यान चौपाळे येथील ग्रामस्थांसाठी सर्व साधारण आरोग्य तपासणी शिबिर लायन्स क्लब व स्मित हॉस्पिटल यांच्या विषेश सहकार्याने आयोजित करण्यात आले.या शिबिरात डॉ चेतन बच्छाव,डॉ प्रवीण धनगर यांनी तपासणी केली तर विशाल केदार, नरेंद्र पाटील, मनोज साबळे, कलावती गावित यांनी सहकार्य केले.
या शिबिरात मोफत वैद्यकीय सल्ला, औषधोपचार ,मोफत शस्त्रक्रिया योजना इ बाबत माहिती देण्यात आली.या शिबिराचा लाभ ९१ ग्रामस्थाना झाला.या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष सतीश चौधरी, ट्रेझरर शंकर रंगलानी, अंकित गुरुबक्षणी, अमित अग्रवाल, श्रीराम मोडक, यांचेसह महिला महाविद्यालयातील रा से यो योजना प्रमुख प्रा. डॉ. झैदी,प्रा. डॉ. आर. एम. साळुंके,प्रा. पी. आर. जोशी, ग्रंथपाल श्रीराम दाऊतखाने आदी उपस्थित होते.