Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वायदा बाजाराची बंदी त्वरीत मागे घ्यावी, आम आदमी शेतकरी संघटनेतर्फे राज्यभर आंदोलनाचा ईशारा

team by team
January 30, 2023
in राजकीय
0
वायदा बाजाराची बंदी त्वरीत मागे घ्यावी, आम आदमी शेतकरी संघटनेतर्फे राज्यभर आंदोलनाचा ईशारा

नंदुरबार | प्रतिनिधी

 

सेबी अंतर्गत होणारे  कापूस, सोयाबीन, तुर, तांदुळ व इतर शेतीमालाचे वायदा बाजाराची बंदी त्वरीत केंद्र सरकारने मागे घ्यावी, अन्यथा  आम आदमी शेतकरी संघटनेतर्फे ५ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चे, आंदोलन, रास्तारोको यासारखे लोकशाही मार्गाने निषेध नोंदविला जाईल, तसेच  जोपर्यंत केंद्र सरकार वायदे बाजाराची बंदी उठवत नाही व शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु राहिल, अशी माहिती आम आदमी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष बिपीन पाटील यांनी पत्रपरिषदेतून दिली.

 

 

 

यावेळी पाटील पुढे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कपाशी, सोयाबीन, हरभरा, तुर इत्यादी पिके घेतली जातात. त्यात मराफवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात वरिल पिके  प्राधान्यक्रमाने घेतली जातात. ज्यावेळी शेतमाल तयार होवून बाजारात विक्रीस शेतकरी आणतो, त्यावेळेस अचानक केंद्र सरकार व्यापारी धार्जिणे निर्णय घेवून शेतकर्यांच्या उत्पादित केलेल्या मालाचे भाव पाडण्याचे काम करते. गेल्या वर्षी २०२२ मध्ये महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी पिडीत झाला. त्यात मोठ्या पिकांचे नुकसान झाले. अशावेळी कापूस, सोयाबीन सारखे पिकांचे  नुकसान झाले. त्यातून शेतकर्‍यांच्या हातात कमी प्रमाणात शेतमालाचे उत्पादन मिळाले. अशावेळी बाजारात शेतमालाला चांगला भाव मिळाला असता तर कमी झालेल्या उत्पादनाची भर भरुन निघाली असती.

 

 

परंतू केंद्र सरकारने परदेशातून माल शून्य टक्के आयात कर लावून कापूस आयात करण्याचे धोरण अवलंबून शेतकर्‍यांचे नुकसान केल्याचा आरोपही करीत पाटील यांनी शासन धोरणाचा निषेध करीत असल्याचे सांगितले. यावेळी ते  पुढे म्हणाले, शेतकर्‍यांच्या शेतमालावर सेबी अंतर्गत होणारे वायदे एक वर्षासाठीबंद करुन सरकारने अजून मेलेल्या शेतकर्‍यांना मारण्याचे काम अवलंबविले असून आम आदमी शेतकरी संघटना ते कदापिही सहन करणार नाही. सेबी अंतर्गत होणारे कृषि मालाचा वायदा बाजाराची बंदी त्वरीत केंद्र सरकारने मागे घ्यावी, अन्यथा  आम आदमी शेतकरी संघटना दि. ५ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चे, आंदोलन, रास्तारोको यासारखे लोकशाही मार्गाने निषेध नोंदविला जाईल,

 

 

तसेच  जोपर्यंत केंद्र सरकार वायदे बाजाराची बंदी उठवत नाही तोपर्यंत शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु राहिल, असा इशाराही पाटील यांनी पत्रपरिषदेतून दिला. यावेळी वेळी धुळे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील, सावळीराम करे, नंदुरबार तालुका जितेंद्र पाटील, अधिकार पाटील, योगेश पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे पाच फेब्रुवारीला हिंदू मेळाव्याचे आयोजन

Next Post

सिनेटसाठी जिल्ह्यात सरासरी ५१ टक्के मतदान

Next Post
सिनेटसाठी जिल्ह्यात सरासरी ५१ टक्के मतदान

सिनेटसाठी जिल्ह्यात सरासरी ५१ टक्के मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add