नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना कर्ज वितरण प्रक्रिया सुलभ होण्यासाठी खा. डॉ. हिना गावित यांच्या प्रेरणेने जिल्ह्यात ज्या गावात राष्ट्रीयीकृत बँक आहे अशा गावी पिक कर्ज व शेती पूरक व्यवसायासाठी वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी येथील महात्मा गांधी विद्यालयात मेळावा घेण्यात आला.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नंदुरबारचे आ.डॉ. विजयकुमार गावित तर प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्र पटेल हे उपस्थित होते.
मेळाव्याची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने .डॉ. विजयकुमार गावित यांच्या शुभहस्ते झाली.यावेळी आ.डॉ. विजयकुमार गावित व महेंद्र पटेल यांचा वसंत रामचंद्र शेवाळे तालुका उपाध्यक्ष भा.ज.पा कैलास काळे,विजय शेवाळे,तुकाराम पाटील,निंबा हेमाडे,दिनेश शेवाळे,छोटू गाठे भूषण हेमाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी आ.डॉ. विजयकुमार गावित म्हणाले की,शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या मार्फत होणारा वित्तपुरवठा सुलभ पद्धतीने व्हावा यासाठी आपल्या नंदुरबार लोकसभा क्षेत्राच्या खासदार डॉ.हिना गावित यांच्या प्रेरणेने बँकांशी निगडीत सर्व कामे एकाच ठिकाणी होण्यासाठी सदर मेळाव्याचे नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले आहेत.यातून सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्ज व शेती पूरक व्यवसायासाठी करण्यात येणारा वित्त पुरवठा तसेच मुद्रा लोन,विविध योजनांसाठी महिलांनी जनधन खाते या मेळाव्यात आपले प्रस्ताव दाखल करावे असे आव्हान केले. या मेळाव्याच्या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी तसेच इतर सर्व विभागांचे शासकीय अधिकारी व राष्ट्रीयकृत बँकेच्या परिक्षेत्रात येणाऱ्या सर्व गावांचे तलाठी,ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, शाखाधिकारी सेंट्रल बँक जिल्हा बँक गटसचिव उपस्थित होते.मेळाव्यासाठी आष्टे,अजेपुर घोगळगाव,अंबापुर,सुतारे हरिपूर,ठाणेपाडा,गंगापूर, ओझर्दे येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.