नंदुरबार l
येथील इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशन, सदा जनसेवा फाऊंडेशन नंदुरबार व हाशमी कमेटी बिल्लीमोरा (गुजरात) यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व मुस्लिम समाजबांधवांचा दि.22 जानेवारी 2023 रोजी नंदुरबार शहरात सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील मुस्लिम बांधव येणार असून जोडप्यांचे सामुहिक पध्दतीने विवाह लावण्यात येईल, अशी माहिती इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांनी पत्रकातून दिली आहे.
याबाबत प्रसिध्दीस पत्रक दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यासह गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील मुस्लिम समाजबांधवांचा सामुहिक विवाह सोहळ्याचे दि.22 जानेवारी 2023 रोजी नंदुरबार येथील बादशाह नगर मैदानात आयोजित करण्यात आले आहे. इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशन, सदा जनसेवा फाऊंडेशन नंदुरबार व हाशमी कमेटी बिल्लीमोरा (गुजरात) यांच्या संयुक्त विद्यमाने सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. या विवाह सोहळ्यास विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व मुस्लिम समाजातील जोडप्यांचे विवाह लावण्यात येतील. तसेच विवाह करणार्या जोडप्यांना घरसंसारोपयोगी काही वस्तू भेट म्हणुन देण्यात येणार आहेत.
नंदुरबार शहरातील बादशाह नगर मैदानात व पालिका सभागृहात सामुहिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम दि.22 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता होईल. तसेच दुपारी 12 ते 3 या वेळेत जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. मुस्लिम समाजातील गोरगरीब कुटूंबियांचा वेळ, पैश्याची बचत व्हावी, यासाठी सामुहिक विवाह सोहळा आयोजित केल्याची माहिती इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशन व सदा जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांनी दिली आहे. या सामुहिक विवाह सोहळ्यात इच्छूक वधु-वरांनी सहभागी होवुन विवाह करावा आणि मुस्लिम समाजबांधवांनी सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशन व सदा जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान, उपाध्यक्ष हाजी असलम चौधरी, हाशमी कमेटी बिल्लीमोरा (गुजरात) चे संस्थापक अध्यक्ष मोहतरम सैय्यद पीरबापु हाश्मी, उपाध्यक्ष गनीभाई मेमन, छन्नु पठाण, मुस्तफा चौधरी, नासिर बागवान, शाकिर बागवान, दानिश बागवान, इरफान खाटीक, मकसुद सैय्यद आदींनी केले आहे.








