शहादा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मातकुट येथे ‘ गाव तेथे शाखा , घर तेथे शिवसैनिक ‘ या अभियानांतर्गत शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले .
नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेतर्फे ‘ गाव तेथे शाखा , घर तेथे शिवसैनिक ‘ हे अभियान राबवण्यात येत आहे.या अंतर्गत मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात शिवसेनेतर्फे शाखा उघडण्यात येत आहेत. त्या अंतर्गत शहादा तालुक्यातील मातकुट येथे शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले .या वेळी माजी जिल्हाप्रमुख दीपक गवते , जिल्हा उपप्रमुख रवींद्र गिरासे , जिल्हा उपसंघटक मधुकर मिस्त्री , तालुका भगवान अलकरी , तालुका उपप्रमुख रमेश कुवर , गटप्रमुख राजेंद्र लोहार , शहरप्रमुख रोहन माळी , शहर संघटक गणेश चित्रकथे , गोपाल भंडारी , दिलीप पाटील , इद्रीस मेमन , लोटन पाटील , गजानन पाटील , शाखप्रमुख समाधान पाटील , शाखा उपप्रमुख लोटन ठाकरे , सचिव अनिल मालचे , मंगलसिंग पवार , अजय पवार , कैलास पवार व शिवसैनिक उपस्थित होते .