Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बहुरुपा शिवारात वनविभागाने बसविले ट्रॅप कॅमेरे

team by team
September 11, 2021
in कृषी
0
बहुरुपा शिवारात वनविभागाने बसविले ट्रॅप कॅमेरे
तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथील वन विभागाने बहुरुपा शिवारात ज्या ठिकाणी बिबट्याची जोडी व सिंह दिसून आला होता.तेथे ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत.आता हे जंगली श्वापदे कॅमेऱ्यात कैद होतात की गुंगारा देतात याची उत्सुकता तळोदा शहरवासीयांना लागली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,  गुरुवारी सकाळी तळोदा येथील बहुरूपा शिवारातील शेतकरी शशीकांत शेंडे व उमाकांत शेंडे या शेतकरी बंधूंना आपल्या शेतापासून शंभर फुटावर सिंह सदृश  प्राणी दिसून आला होता.शिवाय तेथे जवळच बिबट्याची जोडी देखील दिसून आली होती.येथील वन विभागाचा अधिकाऱ्यांनी  सिंह तळोदा तालुक्यात काय तर महाराष्ट्र राज्यातही नसल्याचे सांगितले आहे.तरीही शेतकऱ्यांनी दावा केल्यामुळे वन विभागाने गुरुवारी सायंकाळी ज्या ठिकाणी म्हणजे शेतात हे प्राणी दिसून आले आहेत.येथे दोन ट्रॅप कॅमेरे कर्मचाऱ्यांनी बसविले आहेत.एक कॅमेरा ज्या लिंबाचा झाडास प्राण्याने ओरबडले आहे.तेथे बसविला असून दुसरा पलीकडे बसविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.सात,आठ महिन्यांपूर्वी देखील चीनोदा शिवाराजवळ एका शेतात राजकीय पदाधिकारी व मजूरांना बिबट्याचा थरार अनुभवला होता.तेव्हा वनविभागाने तेथेही ट्रप कॅमेरे बसविले होते.मात्र हे जंगली प्राणी कॅमेरेत कैद झाले नव्हते.आता पुन्हा कालचा घटनेवरून शेतात कॅमेरे बसविण्यात आले आहेत.साहजिकच नागरिकांचे लक्ष ही या कॅमेराकडे लागले आहे.हे प्राणी त्यात कैद होतात की वन विभागाला गुंगारा देतात या बाबत उत्सुकता ताणली गेली आहे.
 वन विभागाने पिंजरेच लावावे.
  सदर प्राण्यांचा शोधासाठी वन विभागाने ट्रॅप कॅमेरे लावले असले तरी या प्राण्यांचा ठोस बंदोबस्तासाठी पिंजरेच लावावे.अशी मागणी जोर धरू लागली आहे.वास्तविक तळोदा शहराचा आजुबाजूस बिबट्याचा वावर असल्याचा तक्रारीचा वन विभागाचे अधिकारी देखील मान्य करीत असतात.तरीही पिंजरे लावले जात नाही.या विषयी जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पिंजरा बाबत अधिकाऱ्यांना विचारले असता असे ठोस कारण शिवाय लावता येत नाही.असे सांगितले जाते.आधीच या हिंस्र प्राणीचा शेत शिवारातील वावरामुळे शेतकरी,शेतमजूर यांचा मध्ये अक्षरशः दहशत पसरली आहे.कुणीच शेतात जायला तयार नाही.त्यामुळे कामेच ठप्प झाली आहेत.अशी वस्तुस्थिती असताना त्यांचा बंदोबस्ताबाबत काहीच उपाय योजना हाती घेतल्या जात नाही.एवढेच नव्हे तर वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील याविषयी उदासीन भूमिका घेत असल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात आढळला दुसरा कोरोना रुग्ण, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक

Next Post

मॉडेल स्कूल सुरु करण्याची मंजूरी मिळवून देण्याचे आमीष देत एकाची तब्बल ६५ लाखात फसवणूक

Next Post

मॉडेल स्कूल सुरु करण्याची मंजूरी मिळवून देण्याचे आमीष देत एकाची तब्बल ६५ लाखात फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add