पत्नीची निर्घुण हत्या करणार्या नराधमास फाशीची शिक्षा देवून पिडीतास न्याय मिळवून द्यावा. तसेच पिडीत महिलेच्या मुलांना शासकीय योजनांमार्फत आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी नंदुरबार भोई समाज सेवा मंडळातर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, जळगांव जिल्ह्यातील चोपडा येथील भोई समाजातील गरीब महिला सौ.मिराबाई संजय चव्हाण (वय ४१) या महिलेस तिचा पती संजय भूरा चव्हाण (भोई) याने दि.५ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता त्याच्या राहत्या घरी धारदार शस्त्राने वार करुन जीवेठार मारले. खून केल्यानंतर तो संबंधित पोलीस स्टेशनला हजर राहून त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेतील मयत महिलेची घरची परिस्थिती गरीबीची असल्या कारणाने तीच्या मुलाबाळांना जीवन बेताचे झाले आहे. यामुळे पिडीत महिलेच्या मुलांना शासकीय योजनांमार्फत आर्थिक मदत मिळवून द्यावी. जेणेकरुन त्यांचे पुढील आयुष्य सुरळीत जाईल. सदरील घटनेचा नंदुरबार भोई समाज सेवा मंडळातर्फे तीव्र निषेध नोंदविण्यात येत असून सदर खटलाकामी ऍड.उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यता येवून सदरील घटला जलदगतीने न्यायालयात चालवून आरोपीतास लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर नंदुरबार भोई सेवा मंडळाचे प्रभारी अध्यक्ष चंद्रकांत गोमाजी खेडकर, उपाध्यक्ष रामकृष्ण शंकर मोरे, सदस्य दिलीप ओंकार मोरे, संजय कथ्थु साठे, नितीन सेना तावडे, देवेश भोई यांच्या सह्या आहेत.