नंदुरबार l प्रतिनिधी
पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित वनवासी विद्यालय व एस.सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय चिंचपाडा, ता. नवापूर येथे संस्थेने सांगितल्याप्रमाणे “ओरोगामी सायन्स क्लबची” स्थापना करण्यात आली .
यावेळी 100 विद्यार्थ्यांनी गणपती प्रतिकृती तयार केल्या.
सर्वप्रथम शाळेचे प्राचार्य बी. एम. निकुंभ यांनी सरस्वती मातेचे पूजन करून उद्घाटन केले. त्यानंतर प्रास्ताविक .एस.व्ही. आहेर यांनी ओरोगामी सायन्स क्लब स्थापनेमागचा उद्देश विद्यार्थ्यांना सांगितला. तसेच प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका चारीता पाटील शिक्षक एम.जे देवरे, पी.जी. देसले, आर .आर. पाटील, श्रीमती अपर्णा शिवदे, एन. डी. मराठे, आर.आर. गावित शिक्षक सायन्स क्लबचे सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते. पी.जी. देसले यांनी ओरोगामी सायन्स क्लब मध्ये गणपती ची प्रतिकृती कशी तयार करावे. गणेशाच्या प्रतिकृतीला कशा पद्धतीने आकर्षक डिझाईन करून सजवावे याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी रंगीत कागदापासुन स्वनिर्मित गणेशाची प्रतिकृती तयार करण्याचा आनंद मिळवला. 100 विद्यार्थ्यांनी गणपती प्रतिकृती तयार केल्या. ए.एस. पाडवी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आभार एम.जे. देवरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर प्रयत्न केला .