नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गालगत बेडकी नाका परिसरात हॉटेल उर्वशी लगतच्या मोकळ्या जागेत अवैधरित्या बायोडिझेल विक्री होत असल्याच्या तक्रारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या.त्यानुसार काल रोजी पुरवठा विभागामार्फत कारवाई करण्यात आली.यात दोन शेड सील करण्यात आले आहेत .
सदर कारवाईदरम्यान दोन पत्र्याचे शेड आढळून आले असून यापैकी एकामध्ये दोन रिडींग युनिट संच व दुसऱ्या शेडमध्ये तीन प्लास्टिकच्या टाक्या , १ एच.पी. मोटर , १ लोखंडी की व पाईप आढळून आला . तसेच टाक्यांमध्ये सुमारे ९ हजार लीटर इतके एस.एन. – ७० व्हाईट ऑईल आढळून आले आहे . सदर दोन्ही शेड पंचनामा करुन सीलबंद करण्यात आले आहेत . स्थानिक माहितीनुसार सदर व्यवसाय फिरोज आगाम करत होते . कारवाई दरम्यान व्हाईट ऑईलचे नमुने घेण्यात आले असून ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत . प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल . सदर कारवाईत पुरवठा विभागाचे मिलिंद निकम , दिलीप पाडवी , अक्षय लोहारकर आदी कर्मचारी उपस्थित होते.तसेच पोलीस विभागामार्फत पोलीस उपनिरिक्षक नासिर पठाण हजर असल्याची माहिती तहसिलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली आहे .