नंदूरबार l प्रतिनिधी
तुळाजा येथील पोस्टमन किरण हिरामण जांभोरे हे तूळाजा येथील धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, किरण हिरामण जांभोरे हे बोरद येथे आपल्या पत्नी व मुलासह राहत होते दि. २२ नोव्हेंबर २०२२ रोजी पहाटे चार वाजेपासून घरातून कोणाला न विचारता व कोणाला काहीही न सांगता निघून गेले होते. तशी हरवल्याबाबतची तक्रार तळोदा पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली होती.
त्यांचा शोध घेतला असता कुठेही मिळून येत नसल्याने काल दुपारी दोन वाजता त्यांचे वडील व काका तुळाजा येथील धरणाकडे पाहण्यासाठी गेले असता. त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. तसेच धरणाजवळ असलेल्या जंगलात त्यांची मोटर सायकल आढळून आल्याने हा आपलाच मुलगा असल्याचे सिद्ध झाल्याने वडील हिरामण वल्लभ जांभोरे यांनी बोरद दुरुक्षेत्राशी संपर्क साधून जमादार गौतम बोराडे यांना याबाबत सूचित केले. गौतम बोराडे यांनी आपले कर्मचारी पोलीस नाईक विजय विसावे यांना घटनास्थळी तात्काळ पाठवले त्यांनी स्थानिकांच्या मदतिने मृतदेह बाहेर काढला व घटनेचा पंचनामा केला .
रात्री उशिरा बोरद पोलीस स्टेशनला अकस्मात मृतयची नोंद करण्यात आली व मृतदेह तळोदा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला. त्यानंतर मृतदेह वडिलांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा पुढील तपास बोरद दुरुक्षेत्राचे पोलीस नाईक विजय विसावे हे करीत आहे.








