नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील सुप्रसिद्ध एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवाला येत्या ७ डिसेंबरपासून सुरवात होणार आहे. या यात्रोत्सवाला होणार्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी ७ ते ३१ डिसेंबर दरम्यान सारंगखेडा मार्गाने होणार्या अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
सुप्रसिद्ध असेलेली सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवाला येत्या ७ डिसेंबरपासून सुरवात होणार आहे. याबाबत पोलिस अधीक्षकांनी काढलेल्या आदेशानुसार सारंगखेडा येथील यात्रोत्सवादरम्यान अनुचित घटना टाळण्यासाठी चारचाकी वाहनांची वाहतूक करणारे ट्रेलर, कारखान्यांची मशिनरी वाहून नेणारे ट्रक व ट्रॉली यांना सारंगखेडा ते दोंडाईचा मार्गाने प्रतिबंधकरण्यात आला आहे.
गुजरात राज्यातून धुळ्याकडे जाणार्या अवजड वाहनांसाठी शहादा, अनरद बारी, शिरपूर मार्गाने सोनगीर धुळ्याकडे रवाना करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. धुळ्याकडून गुजरातकडे आहेत. जाणारी वाहने दोंडाईचा, नंदुरबार, प्रकाशा या मार्गाने किंवा सोनगीर, शिरपूर या मार्गाने अनरद बारीकडून शहादा किंवा गुजरातकडे जाणार आहेत.
हे आदेश ७ ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत राहणार असल्याचे त्यांच्याकडून सूचित करण्यात आले आहे. या आदेशांचा भंग करणार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.








