नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात तळागाळात आर्चरी खेळ कसा पोहोचेल, आर्चरी खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी आर्चरी फेडरेशनच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घ्यावे, क्रीडा शिक्षकांनी याच्यात प्रयत्नशील रहावे, त्यासाठी शासन दरबारी लागणारी मदत कागदपत्र यासंदर्भात मदत योग्य ती मदत केली जाईल. जिल्ह्यातील आदिवासी भागात आर्चरी खेळाचे उपजत गुण असणारे खेळाडू आहेत. परंतु त्यांना स्पर्धांविषयी माहिती व खेळाविषयी आवड निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भारतीय आर्चरी फेडरेशनचे महासचिव तथा भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सदस्य डॉ.प्रमोद चांदुरकर यांनी केले.
येथील किड्स व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून आर्चरी खेळाचा प्रसार व प्रचार कसा होईल, यासंदर्भात नंदुरबार जिल्हा आर्चरी असोसिएशनच्या पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ.प्रमोद चांदुरकर यांनी नंदुरबार जिल्ह्यात आर्चरी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी भारतीय आर्चरी संघाचे प्रशिक्षक प्रवीण शर्मा, नंदुरबार जिल्हा आर्चरी असोसिएशनचे भागुराव जाधव, ज्येष्ठ क्रीडा संघटक प्रा.डॉ.ईश्वर धामणे, छत्रपती पुरस्कार प्राप्त बळवंत निकुंभ, क्रीडा शिक्षक संघटनेचे सचिव मीनल वळवी, श्रीराम मोडक, राजेश शहा, प्रा.डॉ.मयुर ठाकरे, सॅबष्टीन जयकर, अनिल रौंदळ, प्रा.दिनेश सूर्यवंशी, उमेश राजपूत, दिनेश बैसाने, डॉ.तारक दास, राजेश्वर चौधरी, जितेंद्र माळी, संतोष मराठे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भागुराव जाधव तर आभार किड्स व्हॅली संस्थेचे सचिव उमेश राजपूत यांनी मानले.