Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा तालुक्यातील बोरद येथे पपईची झाडे तोडून शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या दोघांना अटक

team by team
August 29, 2021
in क्राईम
0
तळोदा तालुक्यातील बोरद येथे पपईची झाडे तोडून शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या दोघांना अटक

नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील बोरद येथे पपईची झाडे तोडून शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून एक जण फरार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तळोदा पोलीस स्टेशन हद्दीतील बोरद येथील दत्तू रोहिदास पाटील यांचे बोरद शिवारात गट क्र .२१४ मध्ये असलेल्या शेतातील पपईची ६२९ झाडे दि .२३ ते दि .२४ ऑगस्ट दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमांनी खोडसाळपणे तोडून सुमारे १ लाखाचे नुकसान केल्याने त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर गुन्ह्यासंदर्भात गोपनीय माहिती मिळाल्यावरुन राजू दादा ठाकरे रा.छोटा धनपूर , ता.तळोदा , रामलाल रतनसिंग मोरे रा.कळमसरा , ता.तळोदा यांना तळोदा पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा बालम वाऱ्या वळवी रा.छोटा धनपूर , ता.तळोदा याच्यासोबत केला असल्याची कबुली दिली आहे . यातील संशयित राजू ठाकरे याने यापूर्वी फिर्यादीच्या शेतातील झेंडूची फुले तोडली होती . तेव्हा शेतमालकाने त्याला मारले होते . त्यामुळे त्याने रामलाल व बालम यांच्या मदतीने पपईच्या झाडांचे नुकसान केल्याचे सांगितले आहे . यातील दोन्ही संशयितांना अटक करण्याची कारवाई सुरु असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे . सदरची कारवाई पोलीस अधीक्षक , नंदुरबार महेंद्र पंडीत , अपर पोलीस अधीक्षक , नंदुरबार विजय पवार , उपविभागीय पोलीस अधिकारी , अक्कलकुवा विभाग संभाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा , सपोनि.अविनाश केदार , पोहेकॉ महेंद्र जाधव , पोना निलेश खोंडे , पोकॉ राजू जगताप , पोकॉ अजय कोळी , पोकॉ कांतीलाल वळवी यांच्या पथकाने केली आहे . पुढील तपास सपोनि.अविनाश केदार हे करीत आहेत .

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात एम.आय.डी.सी.च्या माध्यमातुन उद्योगधंद्याना चालना देणार : राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांचे प्रतिपादन

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी भाजपातर्फे आज घंटानाद आंदोलन

Next Post
भाजपातर्फे जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन: भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची माहिती

नंदुरबार जिल्ह्यात मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी भाजपातर्फे आज घंटानाद आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add