Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भाजपातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन : जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची माहिती

team by team
August 29, 2021
in राजकीय
0
भाजपातर्फे जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन: भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची माहिती

नंदुरबार |  प्रतिनिधी
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या माध्यम विभागातर्फे गेल्या ७५ वर्षात देशाने काय कमावले ? काय करायचे बाकी आहे ? या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली असून पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे पंचाहत्तर हजार, पन्नास हजार व पंचवीस हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येतील तसेच स्पर्धेतील निवडक निबंधांचे संकलन करून एक ग्रंथ प्रकाशित करण्यात येईल, असे भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी सांगितले.
विजय चौधरी म्हणाले की, आपला देश १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्याची ७४ वर्षे पूर्ण करून अमृत महोत्सवी ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या ७४ वर्षात देशाने अनेक क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. त्याचबरोबर करण्यासारखे बरेच काही राहून गेले आहे. अनेक संधींचा लाभ घेतला तर अनेक संधी गमावल्या. देशाची अर्थव्यवस्था, शेती, सिंचन, शिक्षण, संरक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, सामाजिक सुधारणा अशा अनेक बाबतीत देशाची प्रगती झाली आहे पण त्याचबरोबर अनेक कामे करणे अद्यापही बाकी आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या सर्वाचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. देशासंबंधीच्या महत्त्वाच्या विषयावर अमृतमंथन घडविण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे.
स्पर्धेसाठीचे निबंध चार हजार ते पाच हजार शब्दांचे असावेत, त्यामधील नोंदींच्या संदर्भांचा स्पष्ट उल्लेख असावा आणि निबंध संशोधनपर असावेत अशी अपेक्षा आहे. या निबंध स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांनी विविध विषयांवर व्यापक वाचन करावे आणि काही निश्चित विश्लेषणात्मक भूमिकेतून लेखन करावे, अशी अपेक्षा आहे. स्पर्धेसाठीचे निबंध  bjpmedia@mahabjpmedia.org   या दि.२५ नोव्हेंबरपर्यंत ई मेलने पाठवावेत. विविध क्षेत्राशी संबंधित २५ विषयांची यादी निश्चित केली असून त्या पैकी कोणत्याही एका विषयावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषेत निबंध लिहावा. प्रत्येक भाषेसाठी स्वतंत्रपणे पारितोषिकांची व्यवस्था केली आहे. विषयांची यादी आणि स्पर्धेची नियमावली प्रदेश भाजपाच्या मनोगत या ऍपवर उपलब्ध आहे. गुगल प्लेस्टोअरवरून हे ऍप डाऊनलोड करून घेता येईल. हे ऍप  https://bit.ly/3fhfYRp   या लिंकवरही उपलब्ध आहे. असे भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अण्णासाहेब पी.के.पाटील स्मृती ऑनलाईन खुली राज्यस्तरीय ‘पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेचे’ आयोजन

Next Post

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार प्रलंबीत मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करणार

Next Post

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार प्रलंबीत मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add