नंदुरबार | प्रतिनिधी-
नवापूर येथील जुना सरकारी दवाखाच्या जागेवर नियोजीत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे बांधकाम करावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांना माजी जि.प.अध्यक्ष तथा भाजपाचे नवापूर तालुका अध्यक्ष भरत गावीत यांनी दिले.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन-२०११-१२ या आर्थिक वर्षात नंदुरबार सारख्या १०० टक्के आदिवासी उपयोजना क्षेत्रातील जिल्हयाकरीता मुलींच्या शिक्षणाची प्राथमिकता लक्षात घेऊन शिक्षणापासुन पुर्णपणे वंचित राहिलेल्या तसेच शाळा अर्धवट सोडुन निरक्षरतेच्या दिशेन वाटचाल करणार्या मुलींकरीता शासनाने नंदुरबार जिल्यातील ६ तालुक्यासाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये सुरु केलीत. त्यापैकी नवापूर वगळता उर्वरीत ५ तालुक्याच्या मुख्यालयी स्वतःच्या मालकीच्या जागेत शालेय इमारतीत विद्यालये सुरु आहेत. परंतु नवापूर येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ३ कि.मी. लांब अंतर असलेल्या वाकीपाडा ता. नवापूर येथे भाडयाच्या इमारतीत सुरु आहे हि दुर्दैवाची बाब आहे.
सुरवातीस नवापूर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय शालेय इमारत बांधकामासाठी निंबोणी ता. नवापूर जि. नंदुरबार येथे जवळपास ३५ कि.मी. लांब अंतरावर मंजुरी देण्यात आली होती.परंतु त्यावेळी तात्कालीन खासदार माणिकराव गावीत यांनी हरकत घेऊन तसेच जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर सतत पाठपुरावा करुन नवापूर येथेच शालेय इमारत बांधणेसाठी प्रयत्न केला होता. त्यांचे प्रयत्न व स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्यावेळी मी जिल्हा परीषदेचा अध्यक्ष असतांना संबधित विभागाच्या अधिकार्यांना लेखी सुचना देऊन, सर्व्हे करुन तहसिल कार्यालय, नवापूर या कार्यालयाच्या समन्वयाने जुना सरकारी दवाखाना निर्लेखित करुन कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयासाठी जागा उपलब्ध होऊ शकते याची माहिती उपलब्ध करुन सरकारी जुना दवाखान्याची जागा निश्चीत करण्यात आली . त्यानंतर अध्यक्षपदाची कार्यकीर्द पुर्ण झाल्यानंतर देखील सदर जागेवरच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय व्हावे यासाठी सतत पाठपुरावा करीत आहे व करीतच राहणार.माझ्या या प्रयत्नास यश येऊन सन २०१७ मध्ये जुना सरकारी दवाखान्याची जागा प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या नावावर होऊन शासनाने देखील शाळेचे बांधकाम सुरु केलेले आहे .मात्र स्थानिक काही राजकीय व्यक्ती त्यांच्या स्वार्थापोटी त्या ठिकाणी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय होऊ नये म्हणुन विरोध दर्शवित आहे त्यामुळे आदिवासी व दलित , अनाथ मुली शालेय शिक्षणापासुन वंचित राहणार आहे व त्यांचे मोठया प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे._ म्हणुन आपण सदर कामी जातीने लक्ष. देऊन कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाची शालेय इमारत जुना सरकारी दवाखाना या नियोजित शासकीय जागेवरच होण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली .यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सदस्य भारत गावीत, जि प सदस्या संगीता गावीत, अजय गावित ,प्रकाश गावीत ,धनंजय गावीत हे उपस्थित होते.