नंदुरबार l
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी ते धडगाव रस्त्यावरील भगदरी फाट्याजवळ वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोघांना दुखापत झाली असून याप्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील निंबीपाडा मोलगी येथील विश्रांती दामा पाडवी व मुकेश दामा पाडवी हे दोघेजण दुचाकीने (क्र.एम.एच. १८ एएम ०१३८) मोलगी ते धडगाव रस्त्याने जात होते. यावेळी एका चारचाकी वाहनावरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन (क्र.एम.एच. १८ एजे १७२३) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून भगदरी फाट्याजवळ दुचाकीला धडक दिल्याने विश्रांती पाडवी व मुकेश पाडवी यांना दुखापत झाली.
अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत विश्रांती पाडवी यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.राजंेद्र गावित करीत आहेत.








