नंदुरबार –
मिशन हायस्कूल येथे संपन्न झालेल्या विज्ञान नाट्योत्सवात श्रॉफ हायस्कूलचा चमू यांनी प्रथम क्रमांक मिळवून त्यांची विभाग स्तरावर निवड करण्यात आली.
नाटिकेचा विषय होता “कथा लसीकरणाची ” या कथेत विद्यार्थ्यांनी संसर्गजन्य आजार व इतर आजारांवर माहिती सांगितली व त्यांच्यावर आलेल्या लसी बद्दल माहिती सांगितली .
आत्ताच अलीकडे आलेल्या कोरोना या आजारावर देखील प्रकाश टाकला व लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले.
हे सगळे करत असताना विज्ञान व नाट्य यांची अतिशय सुंदर सांगड घालत विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. यात रेवती माळी ,सलोनी माळी ,प्रसन्न चौधरी ,कृष्णा लांडगे ,उत्कर्षा भारती, नंदिनी कुलकर्णी ,भक्ती पंडित विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
नाटिकेचे दिग्दर्शन व लेखन विद्यालयाच्या शिक्षिका चेतना पाटील व हर्षिता पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांकडून सराव वैभव पाटील, जितेंद्र बारी व मनीषा कलाल या शिक्षकांनी करून घेतला. शाळेचे शिपाई मोहन मिस्त्री यांनी नाटीकेला धोलकीची साथ दिली.
संस्थेचे अध्यक्ष ॲड. रमणभाई शहा, सचिव डॉ. योगेश भाई देसाई, मुख्याध्यापिका सुषमा शहा , उप मुख्याध्यापक राजेश शहा , पर्यवेक्षक जगदीश पाटील व विद्या सिसोदिया यांनी मार्गदर्शन केले व यश मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले